मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

बा भीमा.......

तूच दिला थारा
तूच दिला चारा
सोसाट्याचा मारा
परि तुझाच सहारा ॥

जातिवाद दाट
होता लई बाट
अंधाराची वाट
परि मुखी तुझा नारा ॥

तुझच हे देणं
तुझच हे लेेणं
तुझं गुणगानं
गातो जग आज सारा ॥

लेखणीला वाच्या
आली संजयाच्या
जयभीम नामाच्या
संग वाहे,समतेचा वारा ॥

संजय लिंबाजी बनसोडे

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

जेंव्हा जीवन मागत होतो

जेंव्हा मरण मागत होतो
तेंव्हा जीवनाशी भेटवले
जेंव्हा जीवन मागत होतो
तेंव्हा सरनावर पेटवले ॥

व्वा निसर्गा, तुझा खेळ
मी समजलोच नाही
हजार दिल्या ठोकर तु
तरीही बदललोच नाही ॥

पळत होतो पैशा मागे
शरीर ठेऊन गहाण
कमावले लाखो तरी,
भागली नाही तहान ॥

होते ते सखे तरीही
मनात त्यांच्या गुप्त होते
माझ्या पैशावर डोळा
हावपीसाट आप्त होते ॥

आप्तांच्या रूपात मला
हैवान तु भेटवले
जेंव्हा जीवन मागत होतो
तेंव्हा सरनावर पेटवले ॥

संजय बनसोडे

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

वीर संभाजी

मर्दानी त्याची ख्याती जणू पहाड़
सह्याद्रीही थरथरे ती ऐकून दहाड़ ।

स्वराज्यासाठी लावली प्राणाची बाजी
वीर संभाजी,संभाजी,संभाजी संभाजी ॥

अकाशाची उंची वाऱ्या सम मापे
थरथर थरथर औरंगजेबही कापे ।

कापले शत्रु मैदानी ना केली हाजी हाजी
वीर संभाजी,संभाजी,संभाजी संभाजी ॥

भगवं वादळं पेटलं, हिरव्या रानी
शिवबांचा छावा,ऐकू आलं कानी ।

ना झुकला शत्रु पुढे मरण्या झाला राजी
वीर संभाजी,संभाजी,संभाजी संभाजी ॥

संजय लिंबाजी बनसोडे

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

नाही तुझा ठाव रं

लंगड़ा तुझा डाव लेका
लंगड़ा तुझा भाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

दान आलं खूप तुला
सोन्याचं मुख रं
देणारा खाई तूप परि
नाही त्याला सुख रं ।

श्रद्धेचा घाली घाव
त्याला पैशाची हाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

नावानं तुझ्या आज
यानं मांडला गोंधळ
पुण्य नाही पाप केलं
यानं होऊन आंधळ ।

झाला वेडा गाव मनी
नाही भक्तीभाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

संजय लिंबाजी बनसोडे

जातीची रगातपीती

बुडला याचा धर्म,
याची जात गेली सती
तरी राह्यली याच्या
डोसक्यामधी भीती ।

नवस,व्रत ,पूजा,भक्ती
हीच याची नीती
खितपत पडला ह्यो,
याला मिळणा गती ॥

झाली याला कशी,
जातीची रगातपीती
माणसाला झालीया,
माणसाचीच भीती ।

खपली माणुसकी,
जनावर झाली अती
खितपत पडला ह्यो,
याला मिळणा गती ॥

संजय बनसोडे

विटाळ

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

सर्जिकल स्ट्राइक

भारतीय जवाना प्रमाणे
भारतीय नागरिकांनीही
आता,सर्जिकल स्ट्राइक
करायला पाहीजे........
आणि
इथल्या सत्ताधाऱ्यांना
नेस्तनाबूत करायला पाहीजे.
स्वाईन फ़्लू प्रमाणे
महागाईचा संसर्ग देशाला
आपल्या कचाट्यात
घेत असतांना,
दुसरीकडे गोरक्षकांनी
आणि धर्म रक्षकांनी
दलित,मुस्लिम,पुरोगाम्यांना
संपविण्याचा विडा उचललाय
सत्ताधारी मात्र गप्पच......
शेतकऱ्यांच्या पिकांना
हमीभाव व कर्जमाफ़ी
गुलदस्त्यात ठेऊन
हाई कमांड प्रमाणे
होम कमांडही देशवारी
करतंय......
यांचा विरोध केला
तर आम्ही "साले" झालो
यांच्या विरोधात
आंदोलन केले तर आम्ही
"नकली शेतकरी"झालो
कर्जमाफ़ीसाठी सातत्याने
चकरा मारून ऑनलाईन
अर्ज भरले तर
आमच्या अर्जाची "बोगस अर्ज"
म्हणून मजाक उडवली...
आता बस्स.....
"बाबा, तुझे भीक नको
पण तुझा कुत्रा आवर रे......"
नको आता तुझ्याकडून काही.
कारण,
आता आम्हीही तुमच्या विरोधात
सर्जिकल स्ट्राइक करण्याची
तयारी करीत आहोत......

संजय एल बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...