जेंव्हा मरण मागत होतो
तेंव्हा जीवनाशी भेटवले
जेंव्हा जीवन मागत होतो
तेंव्हा सरनावर पेटवले ॥
व्वा निसर्गा, तुझा खेळ
मी समजलोच नाही
हजार दिल्या ठोकर तु
तरीही बदललोच नाही ॥
पळत होतो पैशा मागे
शरीर ठेऊन गहाण
कमावले लाखो तरी,
भागली नाही तहान ॥
होते ते सखे तरीही
मनात त्यांच्या गुप्त होते
माझ्या पैशावर डोळा
हावपीसाट आप्त होते ॥
आप्तांच्या रूपात मला
हैवान तु भेटवले
जेंव्हा जीवन मागत होतो
तेंव्हा सरनावर पेटवले ॥
संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा