डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाज एकसंघ होण्यासाठी व जातिवाद नष्ट करण्यासाठी आपल्या अस्पृश्य अनुयायांना बोलत,जर अस्पृश्यतेचे निवारण करायचे असेल तर आपल्यात रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार झाला पाहिजे.आणि हे काय चमत्कार करून होणार नाही त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ज्या नवतरुणांना अंतरजातीय विवाह करायचा असेल त्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे.
काही स्पृश्य लोक आंबेडकरांना बोलीत, तुम्ही आम्हांला बोलता की अस्पृश्यता पाळू नका पण तुमच्या अस्पृश्यातच अस्पृश्यता पाळतात त्याचे काय ? महार मांग, भंगी जातीला शिवत नाही. महार, मांग, चांभार हे एकमेकास तुच्छ लेखतात. तेंव्हा बाबासाहेब म्हणाले जी अस्पृश्यता अस्पृश्यात आहे ती तुमचीच देन आहे. बाबासाहेब आंबेडकर महार,मांग,चाभार जातीच्या अस्पृश्यांना नेहमी सांगत तुमच्यात रोटी बेटी व्यवहार व्हायला पाहिजे तेव्हांच तुम्ही एक व्हाल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व अस्पृश्य जातीला एक करण्याचा प्रयत्न करीत होते पण दुःखाची गोष्ट ही की, अद्याप आपण बौद्ध (पूर्वीचे महार ) अजून एक झालो नाही.आपल्यातच अजून एकी नाही. माझे मराठवाड्यात गाव आहे, तिथे मला बौद्धात तीन जाती आढळतात 1) आंधवन 2) लाडवन 3) सोमूस या जातीत अजून बेटी व्यवहार झाला नाही हे बघून आपल्याला आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्नं किती प्रमाणात पूर्ण करीत आहोत याचा प्रमेय होतो.अंतरजातीय विवाह तर दुरच पण आपण आपल्यात समानता आणण्यात ही असमर्थ ठरलो.
आंधवन स्वतःला दोघापेक्षा मोठा समजतो.लाडवन स्वतःला मोठा समजतो सोमूस म्हणतो मी सोमवंशीय आंबेडकर आमच्याच जातीचे. या तीनही जाती विखुरलेल्या आहेत या तीन जातीचा बौद्ध धम्मा व्यतिरिक्त दुसरा काहीही संबध नाही. या तीन जाती एक न होण्याचे दूसरे एक कारण आहे, एका गावात एकच जात आढळते.ज्या गावात आंधवन जातीचे बौद्ध आहेत त्यांच्या आजूबाजूच्या गावात ही आंधवन जातीचे बौद्ध आढळतात. लाडवन आणि सोमूसाच्या बाबतीतही हेच चित्र दिसते.एकाच गावात तीन जाती आढळत नाहीत.त्यामुळे या तीन जातीला एक होण्याची आवश्यकता वाटलीच नसेल.
बाबासाहेबांनी जो जातीअंताचा विडा उचलला होता त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्यातल्या ह्या तीन जाती सर्वप्रथम नष्ट कराव्या लागतील आणि यांच्यात बेटी व्यवहार घडवून या तिन्ही जातीचा अंत करावा.

संजय बनसोडे 9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा