पुणे करारावर सही करून एक अस्पृश्य आंबेडकर ,गांधीजीचे प्राण वाचवतात.
आणि त्याच गांधीजीला एक ब्राम्हण नथूराम गोळी घालून ठार मारतो.
काही ब्राम्हण जातिवाद,मनूवादाला खत पाणी घालतात आणि एक दाभोळकर ब्राम्हण फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य पुढे नेत अंधश्रद्धा मुक्त भारताचे स्वप्न बघतो.
मित्रांनो कोण कोणत्या जातीचा आहे याला महत्व नाही तर कोण आंबेडकरी विचारांचा आहे आणि कोण ब्राम्हणवादी विचारांचा आहे हे ओळखा. कारण ब्राम्हणवादाला खतपाणी घालणारे पुष्कळ आपल्याही समाजात आहेत आणि ब्राम्हणवादाचा नायनाट करणारे पुष्कळ ब्राम्हण समाजात ही आहेत.
गौतम बुद्ध म्हणतात मी कोणत्या जातीत कोणत्या धर्मात जन्मा यावे हे माझ्या हातात नव्हते पण मिळालेल्या जीवनात काय करायचे हे माझ्या हातात आहे.
डॉ बाबासाहेब ही म्हणाले होते मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते पण हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही.
आज आपल्या देशात मेक इन इंडिया पेक्षा जास्त गरज जातीअंतची आहे. आज पुन्हा मनुस्मृती डोके वर करू पाहते. याचे ताजे उदाहरण म्हणजे जे लोकसभा आणि विधानसभेत वेद पुराणामधील गाडलेले देव आणि दैत्य यांचे विषय उकरून पुन्हा हज़ारों वर्षापूर्वीचे ग्रंथ आणि स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
आपला भारत देश जर धर्मनिरपेक्ष ठेवायचा असेल तर लोकसभेत, राज्यसभेत संविधानाविषयीच भाष्य व्हायला पाहिजे नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.
सर्वांना आपल्या जातीचा अभिमान आहे,पण तो घराच्या आतच बरा. बाहेर आपण सारे एक आहोत भारतवासी.
अखंड भारतातच आपले कल्याण आहे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य किती सत्य आहे याची आपल्याला आज प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.
आज देशात जर कोणती लढाई लढण्याची गरज असेल तर ती जातीअंताची होय.
कारण जातीचा अंत झाल्याशिवाय कुणी स्वतःला भारतीय म्हणणार नाही.
जय भीम
संजय बनसोडे
घणसोली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा