आपल्याला आजार झाला की आपल्या पुढे कोणतेही जेवण्याचे ताट ठेवले तर आपल्याला ते कडूच लागते.
जेवतांना आपण जर मिठाई खाल्ली तरी ती कडूच लागते आणि कार्ले खाल्ले तेही कडूच.
आपल्याला गोड कडू गोष्टीची जाण असून सुद्धा आपल्या आजारपणा मुळे आपली जीभ आपल्याला साथ देत नाही.
तोवर देत नाही जोवर तो आजार पूर्णतः बरा होत नाही.
आणि तो आजार पूर्णतः बरा होण्यासाठी आपण नियमित डॉक्टरानी सांगितल्या प्रमाणे औषध गोळ्या घेतो.
व लवकर बरे होण्याचा प्रयत्न करतो. रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करतो.
तसाच आपल्या समाजातील काही जनतेला राजकारणी आजार झाला आहे.
व ते या आजारात आपल्या आंबेडकरी पुढाऱ्या विषयी काहीही बडबडतात.
त्यांचे असे बडबडने निश्चितच समाजासाठी घातक आहे.
त्यांना कोणताही आंबेडकरी पुढारी दिसला की तो आंबेडकर द्रोहीच दिसतो.
आणि तो पुढारी या आजारी व्यक्तीमुळे त्याच्याच समाजात टीकेचा धनी होतो.
आणि त्यांच्या अशा वक्तव्यामुळे आपले नव तरुन,आंबेडकरी पक्षात न जाता इतर पक्षाचा रस्ता धरत आहेत.
व आंबेडकरी कार्याला मुकत आहेत.
व आंबेडकरी कार्याला मुकत आहेत.
अशा समाजातील बीमार लोकांना माझे एकच सांगणे आहे. स्वतःचा इलाज करा.
आंबेडकरी साहित्य वाचून.
आंबेडकरी साहित्य वाचून.
जर तुम्हांला तुमचे पुढारी भरकटलेले आढळले तर त्यांना त्यांचा रस्ता दाखवणे हे तुमचे काम आहे. दुसऱ्यांचे नाही !
त्यामुळे समाजातील पुढाऱ्यांना लक्ष करण्यापेक्षा त्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य कसे होईल यात लक्ष घाला.
म्हणून सांगतो समाजाप्रती डोळस व्हा.
एकदा डोळ्याला कावीळ झाली म्हणजे सर्वच विपरीत दिसू लागते.
सर्वच घाण दिसू लागते.
मनुष्य काहीही बडबड करू लागतो.
सर्वच घाण दिसू लागते.
मनुष्य काहीही बडबड करू लागतो.
जर तुंम्ही त्या पुढाऱ्याचा अभ्यास न करता तो फक्त आंबेडकरी पक्षाचा मुख्य आहे म्हणून त्यावर टीका करत असाल तर तुमच्याही डोळ्याला कावीळ झाली असेच समजा .
जय भीम
संजय बनसोडे घणसोली नवी मुम्बई
9819444028
संजय बनसोडे घणसोली नवी मुम्बई
9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा