शुक्रवार, १ जुलै, २०१६

माणूस अंधश्रध्दाळू का बनतो ?


माणूस अंधश्रध्दाळू का बनतो?
दैवीशक्ति, आत्मा चमत्कार,भानामती, भूत, देवाचे अस्तित्व ह्या विषयी कुणी बोलत असेल तर सर्वांच्या डोक्यात लगेच घुसते. पण या सर्वांच्या विरोधात कुणी बोलले म्हणजे दैवीशक्ति, चमत्कार, भूत अशा गोष्टी खोट्या आहेत असे काही नसते असे जर सांगायचा प्रयत्न केला तर कुणाच्याच डोक्यात घुसत नाही.उलट जो व्यक्ति हे बोलतो त्यालाच वेड्यात काढतात.
मित्रांनो असे का होते ?
याचे उत्तर म्हणजे, आपल्यावर लहानपणापासून झालेले आस्तिक संस्कार.
शाळा असो, मंदिर असो, सिनेमा असो, घर असो, दार असो, सगळीकडे लहानपणापासूनच दैवीशक्तिच्या गोष्टी आपल्या कोवळ्या मनावर बिंबल्या जातात.
सकाळी आंघोळ केल्यावर देवाला नमस्कार करायचा, रोज मंदिरात जायचे, शाळेत गेल्यावर सर्वात अगोदर देवाची प्रार्थना म्हणायची सरस्वती माता ही विद्येची देवता आहे तिला नमस्कार करायचा. शाळेत रामायण, महाभारत अशा देवाच्या कथा तर आहेतच. शाळा सुटल्यावर जेंव्हा तो मुलगा tv बघतो तेंव्हाही तेच रामायण, महाभारत, कृष्णा, महादेव किंवा अलिफ लैला सारख्या चमत्काराने, जादूंनी भरलेल्या काल्पनिक कथा. झोपताना म्हातारी आजी जेंव्हा गोष्टी सांगते त्याही काल्पनिक देवदेवतेच्या किंवा जादू, भूताच्या, राक्षसाच्या असतात.
बऱ्याच सिनेमातही असेच दाखवतात.
सिनेमामधे एखादा नास्तिक असला तर सिनेमाच्या शेवटी देवाला न मानल्यामुळे एकतर मरतो किंवा शेवटी देवाला शरण जातो व देवाचं अस्तित्त्व स्वीकार करतो.
अशाच संस्कारातून आपण लहानाचे मोठे होतो.
व आपल्या अंतर्मनाला व बाह्यमनाला हे नक्की होते की देवाचे, शैतानाचे अस्तित्व आहेच. व ते त्या गोष्टी नाकारण्यास तयार होत नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या समोर कितीही डोके फोडले तरी ते हेच बोलणार, नाही दैवीशक्ति आहेच.
मित्रांनो आताही टीव्हीवर मालिकेत अंधविश्वास, काल्पनिक या गोष्टी व्यतिरिक्त दूसरे काहीही दाखवत नाही.कुठल्या मालिकेत यम येतो व या जमान्यातील लोकांसोबत वावरतो. कुठल्या मालिकेत महादेव येतो, कुठल्या मालिकेत बजरंगबली येतो, कुठल्या मालिकेत आत्मा येऊन कुणाच्या अंगात घुसताे.
मित्रांनो या सर्व गोष्टी आपण एक करमणूक म्हणून बघतो पण आपल्या घरातील लहान कोवळ्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो. व ती गोष्ट तो खरी समजतो.
पूर्वी शक्तिमान नावाची मालिका होती त्यात शक्तिमान जसा उडतो तसेच मुलेही घराच्या छपरावर जाऊन उडण्याचा प्रयत्न करीत होती व हातपाय मोडून घेत होती.
त्यामुळे मित्रांनो आपल्या मुलाला आजपासूनच विज्ञानवादी संस्कार द्या जेणेकरून तो अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकणार नाही व स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकेल कुण्या दैवीशक्तिवर अवलंबून राहणार नाही.
मनोगत ..............✒
संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...