तुझ्या महूची माती लावून रोज कपाळी
गातो तुझी भीमस्तुती विहारी सकाळी !!
गातो तुझी भीमस्तुती विहारी सकाळी !!
.
तीर्थस्थळे जन्मस्थळे हे पाहिले मी बहुत
ज्ञानाची ज्योत दिसे मज भीमा तुझ्या महूत !
ज्ञानाची ज्योत दिसे मज भीमा तुझ्या महूत !
.
चमके भीमतारा तेथे अंधारल्या रातीत
चव न्यारीच वाटे मज त्या महूच्या मातीत !
चव न्यारीच वाटे मज त्या महूच्या मातीत !
.
जावं पुन्हां पुन्हां वाटे, महू गाव ते भाळी
गातो तुझी भीमस्तुती विहारी सकाळी !!
गातो तुझी भीमस्तुती विहारी सकाळी !!
.
तुज मुळेच झालो आज मी मुक्त बंधना
तुज स्मरूनी गातो रोज बुद्ध वंदना !
तुज स्मरूनी गातो रोज बुद्ध वंदना !
.
म्हणूनी दरवर्षी तुझ्या महुला जातो
संजय फक्त येथे भीम गीते गातो !!
संजय फक्त येथे भीम गीते गातो !!
.
चाललो लावूनी आजही क्रांतीची नीळी कपाळी
गातो तुझी भीमस्तुती विहारी सकाळी !!
गातो तुझी भीमस्तुती विहारी सकाळी !!
.
भीमकवी संजय बनसोडे
9819444028
9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा