सोमवार, ४ जुलै, २०१६

सर्व धर्म समभाव ?????????


आजही आमच्या अब्रूचा
अंगविच्छेद केल्या जातो,
.

भरचौकात
.

आजही आमचा बाप
 जोहार घालतो,
.

मनु दरबारी
.

आजही आमच्या बहिणीचे
 लक्तर तोडतात,
.

प्रस्थापित कुत्री.
.

आजही आमचे घरे
बंदिस्त आहेत,
.

शूद्र नावाच्या कोठडीत.
.

आजही आमच्या जीवनाचा
नग्न तमाशा चालू आहे,
.

गावकूसावर.
.

तरीही आम्ही बेंबीच्या
देठापासून बोंबलतो,
.

      "सर्व धर्म समभाव "
.
.

संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...