"जगातील कोणतीही सत्ता या देशाच्या आड येऊ शकणार नाही.अखंड हिंदुस्तानातच आपले कल्याण आहे.हे एक ना एक दिवस मुसलमानांच्याही लक्षात येईल."अशी घटना समिती मधे देशाच्या ऐक्यासाठी सिंहगर्जना करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी देशद्रोही नारे आणि देशाविरुद्ध कृत्य करणारच नाहीत.
आपल्या देशातील उच्चवर्णीय नेहमी इतर जाती धर्माचे मूल्यमापन करतांना जो त्यांच्या धर्माचे आणि देवदेवतेचे गुणगान गातो,जो त्यांच्या धर्माप्रमाणे वागतो तोच देशप्रेमी.आणि जो त्यांच्या धर्माविरुद्ध षडयंत्र करतो,जो त्यांच्या धर्माची चिकित्सा करून चीरफाड़ करण्याचा प्रयत्न करतो तो मात्र देशद्रोही.ही या उच्चवर्णीयांना सवयच जडली.
खरे तर या उच्चवर्णीयांचा दलितांवरचा द्वेष काय आज कालचा नाही.हा त्यांचा द्वेष जेंव्हापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलितउद्धाराचा विडा उचलला तेंव्हा पासुनच आहे. जो पर्यंत दलित समाज मूंग गिळून गप्प होता, जोपर्यंत दलित समाज निमुटपणे त्यांचा अन्याय अत्याचार सहन करीत होता तोपर्यंत उच्चवर्णीयांना तो आपलासा वाटत होता. पण जेंव्हापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात नवक्रांती घडवून आणली, तळागळात असलेल्या दलित समाजाला जागे केले. जेंव्हा दलित समाज आपल्या हक्कासाठी, आपल्या इभ्रतीसाठी झटू लागला. आम्हीही माणसासारखे माणसे आहोत.हे जगाला सांगण्यासाठी,गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी जेंव्हा खडबडून जागा झाला तेंव्हापासूनच उच्चवर्णीयांचा तो दुश्मन झाला तो अध्यापही.आणि याचा प्रमेय ते वेळोवेळी देतात. UP मधे होणारे दलित अत्याचार.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणणाऱ्या राष्ट्रात खैरलांजी जवखेडा सारखे दलित हत्याकांड. नुसत्या बाबासाहेबांच्या रिंगटोन वरून सागरसारख्या निष्पाप भीमलेकराची हत्या हे त्याचेच पुरावे आहेत.
हल्ली तर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वावर चालणाऱ्या दलित विध्यार्थ्यालाच लक्ष केले.अगोदर रोहित वेमूला या दलित विध्यार्थ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले आणि आता त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या दलित विध्यार्थी संघटनांना लक्ष करीत आहेत. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या JNU च्या आंदोलनाला देशद्रोही ठरवून एक वेगळेच वळण देण्याच्या ते प्रयत्नात आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जिवाचे रान करून जी देशाच्या हिताची घटना लिहली त्या घटने विरूद्धी कृत्ये भीमअनुयायी करणारच नाहीत.त्यांना फसवण्यांचा आणि त्यांचा आवाज दाबण्याचा हा उच्चवर्णीयांचा प्रयत्न आपण सारे भीमअनुयायी मिळून हानून पाडू.

संजय बनसोडे
घणसोली
9819444028
घणसोली
9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा