एका गावठी आंब्याच्या छोट्या झाडाला कलम करून त्याला कलमी करत. ही प्रतिक्रिया बघून मला लहानपणी नवल वाटे. या कलमीमुळे त्या आंब्याचे त्याचे स्वतःचे मूळ नष्ट होऊन तो आंबा एका दुसऱ्याच जातीत विलीन होत असे.त्याची अगोदरची जात कितीही आंबट असली तरी त्याला कलम केल्यावर तो गोड व परिपूर्ण बने. ही कलमाची क्रिया करतांना त्याचे फक्त खोड, (मुळांपासून वरपर्यंत फांद्या सोडून ) शिल्लक ठेवून उर्वरित भाग छाटला जात असे आणि त्या उरलेल्या खोडावर दुसऱ्या गोड आंब्याचे कलम जोडल्या जात असे. कालांतराने ते कलम एकजीव होऊन त्या आंब्याला त्याच्या पूर्वीच्या जातीची फळे न येता कलमी गोड मधुर फळे येऊन त्याच्या पूर्वीच्या फळापेक्षा सात पट्टीने बाजारात महाग विकत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही 56 साली महार जातीच्या बुरसटलेल्या खोडावर कलम केले होते. "महार जातीच्या खोडावर बौद्ध धम्माचे कलम " 60 वर्षानंतर का होईना पण त्या कलम केलेला झाडाला बौद्ध धम्माचे गोड मधुर फळे येत आहेत. हे मोठ्या आनंदाने सांगावेसे वाटते.त्याची प्रचिती मला माझ्या घरातच आली.
माझी मुलगी "मनाली बनसोडे 2nd class " हीला एक नोटबुक हवी होती. मी ऑफीस वरून परत येताना एका स्टेशनरी च्या दुकानातून विकत घेऊन तिला दिली.ते नोटबुक बघून माझी सात वर्षाची मुलगी माझ्यावर भडकली,
"पप्पा, आपण देवाला मानत नाही, मंग हे देवाचे चित्र असलेली नोटबुक का घेऊन आलात ?"
खरच, तिचे हे बोलले बघून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कलमेला आज बौद्ध धम्माची फळे येत आहेत.
60 वर्षानंतर का होईना पण कलम पूर्णपणे सक्सेस झाली,ती वाया गेली नाही.

संजय बनसोडे 9819444028
घणसोली
घणसोली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा