आजचा समाज आणि आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज
जय भीम मित्रांनो
बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबेडकरी कार्याच्या नेत्रुत्वाचा धुरा दादासाहेब गायकवाड साहेबांच्या खांद्यावर आला होता व ते यशस्वीरित्या पार ही पाडत होते.
आंबेडकरी समाजातील शिक्षित वर्गही त्याच वेळी समाजाचा लिडर होवू पाहत होता. आणि जनतेला सांगत होता आम्हींच खरे भिमाचे वारसदार, ज्या शिकलेल्या लोकांनी बाबासाहेब हयात असतांना धोका दिला तोच वर्ग नंतर बाबासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवत होते. जो रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी दलित समाजाला न्याय देण्यासाठी खोलला होता त्याच पक्षाला आता वेगवेगळे फाटे फुटत होते त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कंसात आपआपली नाव टाकल्या जात होती आणि समाजाला मूळ समाजकार्याच्या हेतुतून दूर फेकत होती.
आज आपण बघितले तर एकाच शहरात दहा ते पंधरा आंबेडकरी पक्ष उदयाला आलेली दिसतात.आणि स्वतःच्या फायद्यानुसार या ना त्या मोठ्या पक्षाला चिपकलेले दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी बघीतलेल्या स्वप्नातला समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी कुणीही लढताना दिसत नाही. याउलट स्वतःच्या पक्षाची इमेज राखण्यासाठी दुसऱ्या आंबेडकरी पक्षावर हल्ला चढवला जात आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला पहिला संदेश दिला होता "शिका " आम्ही शिकतोय, पण स्वतःसाठी समाजासाठी नाही. एकदा शिकून आरक्षणाचा फायदा घेऊन सरकारी नोकरीत रुजू झाल्यावर आम्ही समाजाकडे ढुंकूनही बघत नाही. मंग आम्हांला आंबेडकरही नको आणि तो समाजही नको. नंतर आम्ही मध्यम वर्गामधे मिळुन स्वतः पुढे हिंदू नावाचा शिक्का लावून एक नवीन जिंदगी जगतो. त्यात ना समाज येत ना आंबेडकर येत. जो पक्ष बंद लिफाफ्या मधे सर्वात जास्त पैसे देईल त्यालाच आम्ही मतदान करतो. आम्ही जिथे राहतो तिथे कुठे आजुबाजुला बौद्ध विहार आहे का नाही , असेल तर तिथे जाण्याचीही आम्हांला गरज वाटत नाही. धम्मदान तर दुरची गोष्ट आहे. मात्र गणपती उत्सव देवी उत्सव आणि इतर सणाला आवर्जून देणगी देतो.
बाबासाहेबांनी दुसरा संदेश दिला होता "संघटीत व्हा "
गल्ली बोळ्या मधे रोज नवनवीन पक्ष बाबासाहेबांच्या नावावर सुरू होत आहेत. या गल्लीतला मनसे सोबत तर दुसऱ्या गल्लीतला शिवसेने सोबत तर तिसऱ्या गल्लीतला भाजप सोबत तर चौथ्या गल्लीतला कॉँग्रेस सोबत दिसतात.
भविष्यात शिवसेना आणि मनसे एक होतील पण हे कदापि होणार नाहीत. पण या सर्व पक्षांचे कार्यही बाबासाहेबांच्या विचारांवर हवे ना ! तेही नाही.
यांचे कार्य तुंम्हीही येणाऱ्या दिवसात बघाल, दही हंडी, नीळी हंडी , गणेशउत्सव असे त्यांचे कार्य, जाती सोबत नाही पण इतर जाती सोबत हे संघटीत नक्की झाले.
समाजातील मध्यम आणि उच्च वर्गीयांना तर समाजाचे आणि आंबेडकरी चळवळीचे काहीही देणेघेणे नाही. कोण मरतय, कोण लढतय, कोण आंदोलन करतय कुठे विटंबना झाली हे महाशय घरात आरामात टीव्हीवर बघतात आणि आपल्याच समाजाची मज़ाक उडवतात.

बाबासाहेबांनी तिसरा संदेश दिला होता "संघर्ष करा "
असा विखुरलेला समाज आणि विहारांचे तोंडही न पाहणारा समाज काय संघर्ष करील ?
अनोळखी व्यक्तीने कधी याला जात विचारली तर लपवणारा काय समाजासाठी संघर्ष करील ?
समाजात वावरताना मुम्बई सारख्या मोठ्या आधुनिक शहरात खूप कमी लोकांची, समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्यात तळमळ बघितली. खूपच कमी लोक आंबेडकरी चळवळीमधे सहभाग घेण्यासाठी उत्सुक दिसतात.
बाकीची 1BHK /2BHK मधे राहणारी समाजाच्या आणि चळवळीच्या लांबच राहण्यात धन्यता मानतात. मित्रांनो हे समाजातील चित्र बदलण्यासाठी आपल्यालाच पुढे यावे लागेल. त्यामुळे आतापासुनच आंबेडकरी कार्याला सुरवात करा

जय भीम जय भारत
संजय बनसोडे -9819444028
संजय बनसोडे -9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा