शुक्रवार, १ जुलै, २०१६

आजही स्त्रीयांना मंदिर बंदी ?

आपल्या हक्कासाठी आजच्या महिलांनी सशक्त बनण्याची गरज आहे !
आजही आपल्याला गावागावात शहराशहरात असे मंदिर आढळतात तिथे स्त्रियांना गाभाऱ्यात जाण्यास मंदिराच्या आत जाण्यास बंदी असते.
हे नियम कशासाठी ?
कुणी केले हे नियम ?
नेमके यावरून काय सिद्ध करायचे ?
हे कुणालाही माहीत नाही.
त्या मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्यालाही हा प्रश्न केला तर तोही एकच उत्तर देतो, जुनी चालत आलेली रुढी परंपरा आहे त्याचे पालन आपण करायलाच हवे.
बापाने बनवलेले मेहनतीचे घर. तो मुलगा मोठा झाल्यावर मुलाला पसंत येत नाही. तो त्याला मोडून नव्या युगातील नवे घर बनवतो. जर आपण काळानुसार सर्वच गोष्टीत बदल करतो मंग ज्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या रुढी परंपरा आहेत. ज्या लिंग भेद करतात ज्या जातिवाद करतात  त्या आपल्या डोक्यातून काढून फेकून का देत नाही.
आज साऱ्या महिलांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवायला हवा. पण खेदजनक बाब ही आहे की ज्या मंदिरात स्त्रीयांना बंदी आहे त्या मंदिरा बाहेर स्त्रीयांच्याच जास्त रांगा दिसतात. त्यांच्यावर जो सनातनी भिक्षुकशाहीने अन्याय केला त्यांना तो दिसतच नाही त्यामुळेच मंदिरातली स्त्री बंदी आजही जशीच्या तशीच आहे.
पूर्वी अस्पृश्य समाजालाही अशीच वागणूक मिळत होती त्यांनाही मंदिरात प्रवेश दिल्याजात नव्हता त्यांनाही समानतेचे वागणूक दिल्याजात नव्हती. त्यावेळेस साऱ्या अस्पृश्य समाजाला एक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी क्रांती केली काळाराम मंदिरा सारख्या मोठमोठ्या मंदिरात जाऊन आंदोलने केली. अस्पृश्यांना ही इतर उच्च जातीप्रमाणे मंदिरात समानतेचे वागणूक देण्यासाठी झटले. पण त्या आंदोलनानी  काही निष्कर्ष लागत नाही हे बघून त्यांनी त्या मंदिराचाच धिक्कार केला. जर तुला आमचा बाट आहे तर आम्हांलाही तुझा बाट आहे जर आम्हांला मंदिर प्रवेशबंदी आहे तर आम्ही त्या मंदिरा जवळ भिरकणारही नाही. आम्हीच तुझ्या जवळ येणार नाही आम्हीच तुला धिक्कारतो. जेंव्हा अस्पृश्यांने मंदिरात जाने बंद केले तेंव्हा हळूहळू नवक्रांती होण्यास सुरवात झाली आणी मंदिरातले अस्पृश्य बंदीचे फलक हळूहळू हटू लागले.
आजच्या काळात मंदिरातल्या  स्त्री बंदी विरोधात अशीच एक नवक्रांती साऱ्या सुशिक्षित महिलांनी एकत्र येऊन करण्याची गरज आहे.
ज्या देवाला आपला बाट आहे अशा देवाचे दर्शन घेऊन काय फायदा ?
खरेतर ही स्त्री बंदी देवाला नसून जुन्या सनातनी विचारसरणीच्या लोकांना आहे. याचा विरोध झालाच पाहिजे आता वेळ आली आहे पुन्हा नवक्रांतीची आणी ही नवक्रांती फक्त महिलाच करू शकतील कारण हा अन्याय फक्त महिलावरच होत आहे.
आजच्या महिलांनी आपल्या हक्कासाठी पेटून उठायलाच पाहिजे
धन्यवाद
संजय बनसोडे
9819444028
sbansode40@gmail.com
घणसोली नवी मुम्बई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...