शुक्रवार, १ जुलै, २०१६

तिच्या अंगात मरीमाय घुसली

एक मैना होती छानं ,जशी लावण्यांची खाणं
तिचं रूप अन् लेणं,होतं निसर्गाचं देणं !

तिला भलतीच अक्कल सुचली
तिच्या अंगात मरीमाय घुसली !!

सोडून मोकळे केसं,झूले रात दिसं
लिंबू अन् मिरचीचं,लागलय तीला पिसं !

तिने झूलाया कंबर कसली
तिच्या अंगात मरीमाय घुसली !!

होता गाव गोळा,चालू करी खेळा
अंगारा लावून लुटण्याची,असे तिची शाळा !

तिच्या बोलण्याने गावकरी फसली
तिच्या अंगात मरीमाय घुसली !!

होतं बीमार पोरं, ठेवलं तिच्या म्होरं
सांगे त्याच्या आईला,नको करू घोरं !

कर नवस, देवी तुझ्यावर रुसली
तिच्या अंगात मरीमाय घुसली !!

बाई होती भोळी,ना ओळखली तिची खेळी
निष्पाप लेकराची,गेली अंधश्रद्धेत बळी !

अशी कशी देवी लेकरावर कोपली
हिच्या अंगात मरीमाय घुसली !!

आली लाश दवाखान्यात, झाली केस  ठाण्यात
उघडं पडलं पितळ,मैना गेली जेल खाण्यात !

केलं नाटक कबूल झायली
हिच्या अंगात ना मरीमाय राहिली !!

संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...