शुक्रवार, १ जुलै, २०१६

मी गरीब आहे, मी अडाणी आहे, मी अपाहिज आहे, आता माझे वय झाले, असे बोलून सतत रडत न राहता सतत लढत रहा.
आणि त्याचे फळ बघा, आयुष्यात तुम्हांला कशाचीही कमी पडणार नाही.
तलवार बनण्याअगोदर लोखंडालाही भट्टीत  पिघळावं  लागतं.
तेंव्हाच त्याला आकार येतो.
थंड लोखंडाची तलवार बनवण्याचा प्रयत्नं कराल तर हातोडा लोखंडावरून तुमच्या कपाळावर कधी  पडेल हे तुम्हांलाही कळणार नाही.
त्यामुळे तुम्हांलाही अगोदर पिघळावं लागेल. आपल्या स्वप्नासाठी रात्रंदिवस  झटावे लागेल.
वीज होऊन दुश्मनावर गर्जावे लागेल, पूर होऊन चट्टानातून जागा काढावीं लागेल.आणि वादळ होऊन सर्वांचे लक्ष वेधून ज्वालामुखी सारखे जमिनीला भेदुन वर यावे लागेल.
तरच विजय तुमच्या पायावर लोटांगन घालेल.
!! संजय बनसोडे  !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...