एक स्त्री असते तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला कंटाळून तलाक ( फारकती ) घेतलेली असते.
आणि दुसऱ्या जोडीदारासोबत स्वखुशीने विवाहबद्ध होते.ती पहिल्या संसारापेक्षा या संसारात दहापट सुखी असते. पहिल्या नवऱ्याकडून तिला मानसिक शारीरिक त्रास, हीन वागणूक शिव्यागाळच मिळाला. नवरा रोज दारू पिऊन हैदोस घालीत असे.सासू सासऱ्याचा रोज त्रास, तिला त्या घरात आपुलकीने कधी वागणूक मिळालीच नाही तीला त्या घरात कुणी त्या घराचा हिस्सा समजलेच नाही. ह्या साऱ्याच्या त्रासामुळे तिचे जीवन असंख्य शारीरिक आणि मानसिक वेदनाने ग्रासून गेले होते. यातून तिला मुक्तता हवी होती.तिचे हे दुःख बघून तिच्या बापाने तिला या दुखातून मुक्त केले, तलाक घेऊन.आणि एका सुशिक्षित घराण्यात पुन्हां तिचे थाटामाटात लग्न लावून दिले.

आता ती खूप सुखी आहे. तिची सासू तिला तिच्या आईपेक्षाही जास्त प्रेम करीत होती. सासरा बापाप्रमाणे वागवत होता. काम करण्यासाठी घरात नौकर चाकर होते. नवराही खूप प्रेमाळू तिला कशाचीही कमी नव्हती.सर्वप्रकारचे सुख,स्वातंत्र्य असूनही ती मात्र या संसारात रमून सर्वासोबत सुखाने नांदन्यापेक्षा ती रोज पहिल्या नवऱ्याच्या दारी जावून भांडत असे.त्यांना दोष देत असे आणि आपल्या आताच्या सासू सासऱ्याचे उदाहरण देऊन त्यांना छळित असे. जेंव्हा ती घरी येत असे तेंव्हाही ती अगोदरच्या नवऱ्याचे अन् सासू सासऱ्याच्या गाऱ्हाण्याचा पाढाच रोज गिरवत असे. यामुळे झाले असे की, नवीन घरातले नियम, नवऱ्याला काय हवं आहे सासू सासऱ्याला काय हवं आहे.आपले नवीन नातेवईक किती आहेत कोण आहेत कुठे आहे याचे तिला काहीच माहीत नव्हते व माहीत होण्यासाठी ती प्रयत्नही करत नव्हती. ती दररोज आपल्या अगोदरच्या नवऱ्याला दोष देण्यातच व्यस्त असे. बिचारे सासू सासरे मात्र वाट बघत होते ती कधी अगोदरच्या संसाराला विसरून आम्हांला आपलं समजेल .........
मित्रांनो कदाचित आपणही त्या स्त्री सारखे तर करत नाही ना..... !
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली.आपण मात्र बौद्ध धम्माचा प्रचार अन् प्रसार करण्यापेक्षा हिंदू आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करण्यात आपल्या पिढ्या गमावत आहोत.
तुम्ही बोलाल बाबासाहेबांनीही हिंदू धर्मावर देवांवर ब्राह्मणावर टीका केली आम्ही त्यांचे अनुयायी मंग आम्ही का नको ?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर ब्राह्मणावर टीका केली तो त्यांचा हक्क होता. कारण ते तेंव्हा हिंदू होते. तेंव्हा ते हिंदु धर्माच्याअनिष्ट रुढी परंपरा नष्ट होण्यासाठी झगडत होते आणि यात व्यत्यय आणणार्यावर ते टिकास्त्र उचलीत होते.पण जेंव्हा त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेंव्हा त्यांनी हिंदू धर्माशी असलेले सारे नाते तोडले.त्यांनी सरळ आपल्या 22 प्रतिज्ञेत सांगितले की मी हिंदू धर्माला मानणार् नाही.मी ब्रह्मा विष्णुला मानणार नाही मी राम कृष्णाला मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म जगाला सांगण्यापेक्षा जो धर्म आपला नाही जो देव आपला नाही त्यावर टीका करण्यात काय उपयोग.बाबासाहेब हिंदू असतांना त्यांना सतत उच्चवर्णीयांनी छेळले त्यांनीही वेळोवेळी आपल्या झुंजार लेखणीतून त्यांना जशास तसे उत्तर दिले. मित्रांनो ब्राह्मण हिंदू धर्म आपल्यासाठी भूतकाळ आहे पण बौद्ध धम्म आपल्यासाठी वर्तमान आणि भविष्यकाळ आहे.जेवढ्या लवकर आपण बौद्ध धर्म स्वीकारून आपल्या समाजात त्याचा प्रचार आणि प्रसार करणार नाही तोपर्यंत आपला समाज प्रगतीच्या मार्गवर जाणार नाही.
आधीच वेळ खूप झाला आहे आतातरी सुधरा आणि बौद्ध धम्माचे कार्य हाती घ्या.

जय भीम
संजय बनसोडे
घणसोली
नवी मुम्बई,
संजय बनसोडे
घणसोली
नवी मुम्बई,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा