बुधवार, २९ जून, २०१६

sant gadage baba

संत गाडगे बाबाने आपल्या कीर्तनात देवा धर्माचा प्रचार न करता शिक्षणाचाच प्रचार का केला ?
आपल्या मराठी मातीला जितकी संत परंपरा लाभली तितकी दूसरी कुठेही दिसणार नाही. सर्वच संतांनी देव,धर्म,आत्मा,पाप,पुण्य,मोक्ष प्राप्ती या काल्पनिक विषयावरच जनजागृती केली. पण या मराठी मातीत जन्मलेला संत गाडगे बाबा यांनी जीवनाचा खरा मार्ग सांगितला. संत गाडगे बाबांनी इतर संता प्रमाणे मेल्यावर स्वर्गात जाण्यासाठी काय करावे हे इथल्या जनता जनार्दनला सांगितले नाही तर आता जगत असलेले जीवन आनंदात कसे जगता येईल यांचीच शिकवण ते वांरवार देत राहिले.
गाडगे बाबा हयात असतांना त्यांनी अनेक शाळा चालवल्या अनेक संस्था खोलल्या. पण आजकालच्या बाबा रामदेव, श्री श्री सारखा व्यवसाय नाही केला ते आयुष्यभर जनतेची सेवा करीत राहिले व भिक्षा मागून खात राहिले. गाडगे बाबा स्वतः शिकलेले नसतांना ही तुम्ही शिका तुमच्या पोराबाळांना शिकवा.देवाच्या नवसाला बोकड घेण्यापेक्षा त्याच पैशात मुलांचे शिक्षण करा. का बरे गाडगे बाबा शिक्षणाला येवढे महत्व देत होते ? कारण, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांदेखत एक अशी घटना बघितली की, ती बघून त्याने निर्णय घेतला की मी कीर्तनातून बहुजन जनतेला खरा देव सांगणार आणि त्याचे दर्शन घडवणार्.आणि तो खरा देव म्हणजे शिक्षण.
संत गाडगे बाबांना सन्यास घेऊन नुकतेच बारा तेरा वर्ष उलटले होते. बाबा नुकताच चिंध्या बाबा,गाडगे बाबा या नावाने महाराष्ट्रात परिचयाचा होऊ लागला. ते असेच फिरत फिरत एका गावात गेले असता तिथली ही घटना,
एका महाराचा मुलगा मुम्बईला गेला होता.खूप दिवस झाले तरी त्याची खुशालीचे पत्रच आले नव्हते.  खेडेगावी त्याचे ते अडाणी म्हातारे  माय बाप परेशान, ना मुम्बईला जाता येत ना निरोप पाठवता येत. ते रोज आपल्या मुलाच्या पत्राची वाट पहात.टपाल ऑफीसात जाऊन विचारपूस करीत. शेवटी त्याचे पत्र आले आणि त्या अडाणी महार अपत्याला आनंद झाला. पण पत्र वाचणार कोण ? गावात फक्त एक कुलकर्णी महाराज शिकलेला , म्हाताऱ्या महाराने  जसे पत्र आले तसे कुलकर्णीच्या  वाड्यात हात जोडून उभा,
कुलकर्णी बाहेर झूल्यावर झूला घेत तोऱ्यात म्हणाला,
काय रे महारा,काय काम हाय ?
(हात जोडून ) काय नाय मालक पोराचं मुम्बईउन पतर आलय ते वाचून सांगा ?
ठीक हाय,दे इकडं
कुलकर्णी त्याच्या हातून पत्र हिसकावतो व त्याला आज्ञा देतो,
ते सात आठ झाडाचे खोड दिसतात ना ते फोडून दे,मंग वाचून दाखवीन पत्र तुझ.
जी माय बाप, फोडतो मी पण त्यात बरं वाईट काय नाही ना !
अगोदर फोड मंग सांगिन,
म्हातारा महार खोड फोडित फोडित कुलकर्णीला विचारीत होता आणि कुलकर्णी शिव्या देत  अगोदर  फोडून नंतर सांगेन असे बजावत होता.
त्या महाराने बड्या मुश्किलीने तीन खोड फोडून दिली.त्याच्या अंगात आता जीव उरला नव्हता. तो कुलकर्णीला  म्हणाला बस्स मालक आता खोड फोडायला मह्यात हिम्मत नाय. तुम्हांला वाचून द्यायच नसल तर द्या मह पतर मी परगावी जावून वाचून घेईन. तेंव्हा कुलकर्णी उठून त्याला म्हणाला,
जा नाही देत,
ते सर्व फोडून दे नाहीतर पत्र मिळणार नाही.
हे सर्व गाडगे बाबा थोड्या अंतरावरुन बघत होते, ते सरळ त्या महारा जवळ आले आणि म्हणाले,
द्या ती कुऱ्हाड !
कुऱ्हाड हाती घेऊन त्याने कुलकर्ण्याचे सारे खोड फोडून दिले.
कुलकर्णी मात्र ते पत्र न वाचताच त्या महाराच्या हाती दिले आणि पाय आपटत वाड्यात गेला.
तेंव्हा गाडगे बाबा त्या महाराला म्हणाला,
बाबा तु आणि मी दोघेही गाढव आहोत. चार अक्षर शिकलो असतो तर तुझी ही अवस्था झाली नसती आणि माझीही झाली नसती.
" शिक्षणा शिवाय माणूस दगड "
त्यामुळे गाडगे बाबा आपल्या सर्वच कीर्तनात जनतेला बजावत असत,
बापहो आपल्या पोरांना शिकवा स्वतः शिका !
            !!संजय बनसोडे 9819444028!!

samiksha "deu vadalashi ladhe"


स्वातंत्र्योत्तर काळात दलित कवींच्या सशक्त कविता मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून बहरत राहिल्या. तिच्याशी नाते सांगणारी संजय बनसोडे यांची ही कविता आहे.अंतर्मनातील तरल संवेदनांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती म्हणजे कविता. तिच्यामध्ये केवळ कवीच्या व्यक्तीगत भावविश्वाचे तरंग उमटतात असे नाही तर, कवी ज्या वातावरणात जन्मला, वाढला त्या समाजाचेही प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटतेच. संजय बनसोडेच्या कवितेच्या संदर्भात तरी हे तंतोतंत खरे आहे.त्यांच्या कवितेचा जन्मच मुळी प्रखर सामाजिक जाणिवेतून झालेला आहे.याचा प्रत्यय त्यांच्या जवळजवळ प्रत्यक कवितेत आल्याशिवाय रहात नाही. परदुःखाबद्दल करुणा, अन्यायाची चाड आणि समाजपरिवर्तनाचे विशाल स्वप्न पाहणारे कवीमन या त्रिवेणी संगमातून जन्मलेल्या या कवितांना आपले स्वतःचे असे एक आगळे वेगळे रूप आहे. आणि वाचकाच्या ह्रुदयाला हात घालू शकेल असे समर्थ अवाहन आहे. हेच या कवितेचे यश आहे यात शंका नाही.
शेवटी एवढेच सांगेन की, संजय बनसोडे हे एक परिवर्तन चळवळीतील शाहू,फुले,आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवणारे नव्या पिढीचे शिलेदार आहेत.माणसांच्या मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या  रुढी,कर्मकांड यावर प्रकाश टाकून माणसांनी माणसावर प्रेम करायला शिकले पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर सत्ता, संपत्ती, शिक्षण यांच्यात सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे हा सदसदविवेक त्यांच्या ठायी भरला आहे. त्यातूनच त्यांची कविता बहरली आहे ....

प्रो. जगदीश काबरे
CBD बेलापुर
नवी मुम्बई

 

 

 

 

 

 

samiksha


माणुसकी जात आणि मानवता धर्म मानून समाजातल्या अनिष्ट चाली रीतीला व अंधश्रद्धेला सुरुंग लावणाऱ्या विद्रोही कवी पैकी एक म्हणजे "भीमकवी संजय बनसोडे " धर्मातल्या रूढी परंपरा व मानव जातीला हानिकारक असलेल्या संस्कृतीच्या प्रवाहाबरोबर चालणारे कवी तर खूप  आहेत, पण या प्रवाहाच्या विरुद्ध समाजासोबत आपल्या लेखणीतून विद्रोह करणारे कवी, लेखक खूप कमी वाचायला मिळतात. अनिष्ट रूढी परंपरे विरुद्ध व देवा धर्माविरुद्ध वेळोवेळी आपल्या झुंजार विद्रोही लेखणीतून ताशेरे ओढतांना संजय बनसोडे तर नेहमीच दिसतो.
संत गाडगे बाबाने सांगितल्या प्रमाने देव दगडात शोधण्यापेक्षा माणसात शोधा. तुम्हांला माणसातच देव मिळेल.हीच गाडगे बाबांची शिकवण संजय बनसोडेच्या कविता वाचताना आम्हांला बघायला मिळते.
त्यांचा नुकताच येऊ घातलेला विद्रोही कवितासंग्रह "देऊ वादळाशी लढे" याला आमच्या "कुष्ठरोगी दिनदलित सेवा संघ "संस्थेतर्फे लाख लाख शुभेच्छा.व त्यांची पुढची साहित्याची वाटचाल अशीच पुढे पुढे जात राहो व महाराष्ट्रातल्या घराघरात त्यांचे विचार जावोत हीच प्रार्थना.

 

AVINASHA MHATRE

 ANBARNATHA

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...