संत गाडगे बाबाने आपल्या कीर्तनात देवा धर्माचा प्रचार न करता शिक्षणाचाच प्रचार का केला ?
आपल्या मराठी मातीला जितकी संत परंपरा लाभली तितकी दूसरी कुठेही दिसणार नाही. सर्वच संतांनी देव,धर्म,आत्मा,पाप,पुण्य,मोक्ष प्राप्ती या काल्पनिक विषयावरच जनजागृती केली. पण या मराठी मातीत जन्मलेला संत गाडगे बाबा यांनी जीवनाचा खरा मार्ग सांगितला. संत गाडगे बाबांनी इतर संता प्रमाणे मेल्यावर स्वर्गात जाण्यासाठी काय करावे हे इथल्या जनता जनार्दनला सांगितले नाही तर आता जगत असलेले जीवन आनंदात कसे जगता येईल यांचीच शिकवण ते वांरवार देत राहिले.
गाडगे बाबा हयात असतांना त्यांनी अनेक शाळा चालवल्या अनेक संस्था खोलल्या. पण आजकालच्या बाबा रामदेव, श्री श्री सारखा व्यवसाय नाही केला ते आयुष्यभर जनतेची सेवा करीत राहिले व भिक्षा मागून खात राहिले. गाडगे बाबा स्वतः शिकलेले नसतांना ही तुम्ही शिका तुमच्या पोराबाळांना शिकवा.देवाच्या नवसाला बोकड घेण्यापेक्षा त्याच पैशात मुलांचे शिक्षण करा. का बरे गाडगे बाबा शिक्षणाला येवढे महत्व देत होते ? कारण, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांदेखत एक अशी घटना बघितली की, ती बघून त्याने निर्णय घेतला की मी कीर्तनातून बहुजन जनतेला खरा देव सांगणार आणि त्याचे दर्शन घडवणार्.आणि तो खरा देव म्हणजे शिक्षण.

संत गाडगे बाबांना सन्यास घेऊन नुकतेच बारा तेरा वर्ष उलटले होते. बाबा नुकताच चिंध्या बाबा,गाडगे बाबा या नावाने महाराष्ट्रात परिचयाचा होऊ लागला. ते असेच फिरत फिरत एका गावात गेले असता तिथली ही घटना,
एका महाराचा मुलगा मुम्बईला गेला होता.खूप दिवस झाले तरी त्याची खुशालीचे पत्रच आले नव्हते. खेडेगावी त्याचे ते अडाणी म्हातारे माय बाप परेशान, ना मुम्बईला जाता येत ना निरोप पाठवता येत. ते रोज आपल्या मुलाच्या पत्राची वाट पहात.टपाल ऑफीसात जाऊन विचारपूस करीत. शेवटी त्याचे पत्र आले आणि त्या अडाणी महार अपत्याला आनंद झाला. पण पत्र वाचणार कोण ? गावात फक्त एक कुलकर्णी महाराज शिकलेला , म्हाताऱ्या महाराने जसे पत्र आले तसे कुलकर्णीच्या वाड्यात हात जोडून उभा,
कुलकर्णी बाहेर झूल्यावर झूला घेत तोऱ्यात म्हणाला,
काय रे महारा,काय काम हाय ?

(हात जोडून ) काय नाय मालक पोराचं मुम्बईउन पतर आलय ते वाचून सांगा ?
ठीक हाय,दे इकडं
कुलकर्णी त्याच्या हातून पत्र हिसकावतो व त्याला आज्ञा देतो,
ते सात आठ झाडाचे खोड दिसतात ना ते फोडून दे,मंग वाचून दाखवीन पत्र तुझ.

जी माय बाप, फोडतो मी पण त्यात बरं वाईट काय नाही ना !
अगोदर फोड मंग सांगिन,
म्हातारा महार खोड फोडित फोडित कुलकर्णीला विचारीत होता आणि कुलकर्णी शिव्या देत अगोदर फोडून नंतर सांगेन असे बजावत होता.
त्या महाराने बड्या मुश्किलीने तीन खोड फोडून दिली.त्याच्या अंगात आता जीव उरला नव्हता. तो कुलकर्णीला म्हणाला बस्स मालक आता खोड फोडायला मह्यात हिम्मत नाय. तुम्हांला वाचून द्यायच नसल तर द्या मह पतर मी परगावी जावून वाचून घेईन. तेंव्हा कुलकर्णी उठून त्याला म्हणाला,

जा नाही देत,
ते सर्व फोडून दे नाहीतर पत्र मिळणार नाही.

हे सर्व गाडगे बाबा थोड्या अंतरावरुन बघत होते, ते सरळ त्या महारा जवळ आले आणि म्हणाले,
द्या ती कुऱ्हाड !
कुऱ्हाड हाती घेऊन त्याने कुलकर्ण्याचे सारे खोड फोडून दिले.
कुलकर्णी मात्र ते पत्र न वाचताच त्या महाराच्या हाती दिले आणि पाय आपटत वाड्यात गेला.
तेंव्हा गाडगे बाबा त्या महाराला म्हणाला,
बाबा तु आणि मी दोघेही गाढव आहोत. चार अक्षर शिकलो असतो तर तुझी ही अवस्था झाली नसती आणि माझीही झाली नसती.
" शिक्षणा शिवाय माणूस दगड "
त्यामुळे गाडगे बाबा आपल्या सर्वच कीर्तनात जनतेला बजावत असत,
बापहो आपल्या पोरांना शिकवा स्वतः शिका !

!!संजय बनसोडे 9819444028!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा