स्वातंत्र्योत्तर काळात दलित कवींच्या सशक्त
कविता मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून बहरत राहिल्या. तिच्याशी नाते
सांगणारी संजय बनसोडे यांची ही कविता आहे.अंतर्मनातील तरल संवेदनांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती
म्हणजे कविता. तिच्यामध्ये केवळ कवीच्या व्यक्तीगत भावविश्वाचे तरंग उमटतात असे नाही
तर, कवी ज्या वातावरणात जन्मला, वाढला त्या समाजाचेही प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटतेच.
संजय बनसोडेच्या कवितेच्या संदर्भात तरी हे तंतोतंत खरे आहे.त्यांच्या कवितेचा जन्मच
मुळी प्रखर सामाजिक जाणिवेतून झालेला आहे.याचा प्रत्यय त्यांच्या जवळजवळ प्रत्यक कवितेत
आल्याशिवाय रहात नाही. परदुःखाबद्दल करुणा, अन्यायाची चाड आणि समाजपरिवर्तनाचे विशाल
स्वप्न पाहणारे कवीमन या त्रिवेणी संगमातून जन्मलेल्या या कवितांना आपले स्वतःचे असे
एक आगळे वेगळे रूप आहे. आणि वाचकाच्या ह्रुदयाला हात घालू शकेल असे समर्थ अवाहन आहे.
हेच या कवितेचे यश आहे यात शंका नाही.
शेवटी एवढेच सांगेन की, संजय बनसोडे हे एक परिवर्तन चळवळीतील शाहू,फुले,आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवणारे नव्या पिढीचे शिलेदार आहेत.माणसांच्या मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या रुढी,कर्मकांड यावर प्रकाश टाकून माणसांनी माणसावर प्रेम करायला शिकले पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर सत्ता, संपत्ती, शिक्षण यांच्यात सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे हा सदसदविवेक त्यांच्या ठायी भरला आहे. त्यातूनच त्यांची कविता बहरली आहे ....

प्रो. जगदीश काबरे
CBD बेलापुर
नवी मुम्बई
CBD बेलापुर
नवी मुम्बई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा