काल महापरिनिर्वाण दिनांनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, खेड्यापाड्यातून आंबेडकरी गोरगरीब जनता महामानवाला अभिवादन करण्यासाठी आली होती.त्यांच्या सोयीसाठी अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी,पक्षांनी,कार्यकर्त्यानी मुम्बईतल्या छोट्यामोठ्या संस्थांनी अन्नदान वाटप केले. त्या सर्व कंपन्याचे, संस्थेचे,पक्षांचे सर्वप्रथम अभिनंदन.
अन्नदान वाटप होत असतांना मला एका गोष्टीचे फार वाईट वाटत होते.आपल्या जनतेकडून मला प्रचंड प्रमाणात अन्नांची नासाडी होतांना दिसली.
एका संस्थेचा टेंपो आला.त्यांनी पोहे आणले.सर्वांनी रांगा लावून पोहे घेतले आणि खाऊ लागले,तोच दुसऱ्या संस्थेचा टेंपो आला त्यांनी वाटप करण्यासाठी खिचडी आणली. पोहे खात असणारी जनता अर्धे पोहे तसेच सोडून पुन्हा खिचडीच्या रांगेला लागली. ते पोहे मात्र तसेच त्या प्लेट मधे पडलेले.त्यावर कुणी पाय देऊन जात होते कुणी ओलांडून जात होते.तिसरा टेंपो पूरी भाजीचा आला.
काही बहाद्दर असे होते,त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की, हे फक्त येथे खाण्यासाठीच आले काय ?
शिवाजी पार्क मैदानात हे असेच चित्र अनुभवायला मिळाले.
जेंव्हा चार वाजता पुन्हा मी तिथे गेलो, तर जिथे अन्नदान वाटप होत होते ती जमीन अन्नाने माखून गेली होती.
मित्रांनो, तुमच्यासाठी स्थानिक संस्था अन्नदान वाटप करतात.कारण, आपण खूप लांबून बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी मुम्बईत येत असता. त्यांची मेहनत पैसा खर्च करून ते तुमच्यासाठी अन्न आणतात .त्या अन्नांची नासाडी तुम्हांला योग्य वाटते का ?
आपण आपल्या घरात एक भाताचे शीत तरी वाया जावू देतो का ?
मंग येथे का अन्नांची नासाडी ?
पुढच्या वेळी स्थानिक संघटनेने याकडे लक्ष देऊन हा प्रकार थांबवला पाहिजे.

संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा