मी तिला यशवंत मनोहरची
कविता ऐकवली
तिने तोंड वाकडे केले...
कविता ऐकवली
तिने तोंड वाकडे केले...
मी तिला नामदेव ढसाळची
कविता ऐकवली
ती माझ्यावर चिडली....
कविता ऐकवली
ती माझ्यावर चिडली....
मी तिला भगवान निळेची
कविता ऐकवली
ती रागावून निघून गेली...
कविता ऐकवली
ती रागावून निघून गेली...
चंद्राच्या शीतल छायत
चांदण्यात,
रानात, नाजुक फूलात
रमणारी ती....
चांदण्यात,
रानात, नाजुक फूलात
रमणारी ती....
कदाचित
तिला आमची वास्तववादी कविता
आवडली नसावी ....
तिला आमची वास्तववादी कविता
आवडली नसावी ....
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा