प्रेम म्हणजे काय असते ?
दोन चामड्याचा खेळ
का आयुष्यभराचा मेळ !
दोन चामड्याचा खेळ
का आयुष्यभराचा मेळ !
प्रेम म्हणजे काय असते ?
दोन मनाची वासना
का आयुष्यभराच्या वेदना !
दोन मनाची वासना
का आयुष्यभराच्या वेदना !
प्रेम म्हणजे काय असते ?
दोन मिनिटाचे सुख
का आयुष्यभराचे दुख !
दोन मिनिटाचे सुख
का आयुष्यभराचे दुख !
प्रेम म्हणजे काय असते ?
दोन जिवाचा संसार
का आयुष्यभराचा अंधार !
दोन जिवाचा संसार
का आयुष्यभराचा अंधार !
प्रेम म्हणजे काय असते ?
इच्छा नसतांनाही आलेल्या कळा
का आयुष्यभरासाठी लागलेला लळा !
इच्छा नसतांनाही आलेल्या कळा
का आयुष्यभरासाठी लागलेला लळा !
प्रेम म्हणजे काय असते ?
एका सोबतच उपभोगलेली मजा
का आयुष्यभर वाट्याला आलेली सजा !
एका सोबतच उपभोगलेली मजा
का आयुष्यभर वाट्याला आलेली सजा !
प्रेम म्हणजे काय असते ?
जे पण असते
ते प्रत्येकाचे सेम नसते !
जे पण असते
ते प्रत्येकाचे सेम नसते !
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा