सत्य अजून मी जाणले कुठे
देवाला अजून मी मानले कुठे ॥
उपास,व्रत हे वायफळ आहे
खरे समोर मी आणले कुठे ॥
मठ्ठाधीस, अब्जाधीश झाले
गरीबांना, भक्त गणले कुठे ॥
नवसासाठी जीवहत्या केली
माणूस तुम्ही, बनले कुठे ॥
नसला जरी ,आहे म्हणती
भक्तीचे नाते ताणले कुठे ॥
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा