सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

मेरा देश बदल रहा हैं

मेरा देश बदल रहा हैं ...?

खरोखरच माझा देश बदलतोय.येथे सर्वांनी आपली माणुसकी गहाण ठेवून स्वार्थाच्या बूरख्यात वावरताना सर्व आपल्या अहंकारातच तल्लीन झाले आहेत.
माणुसकीच्या नात्याने जवळ येताना आज कुणी दिसतच नाही. जिथे फायदा आहे तिथेच लाळ गाळायची सर्वांना सवयच लागली.दुःखात दारिद्रय़ात असणाऱ्यांचा आज कुणी वालीच उरला नाही.आजकाल तर मानवतेची हत्या करणारे प्रकरण जागोजागी दिसत आहेत. असह्य वेदनाने तळमळणाऱ्यांना तात्काळ मदत करुन दवाखान्यात पोचवण्यापेक्षा त्रासाने विवळत असलेल्या  पीड़ित व्यक्तीचे मोबाईल मधे फोटो काढून फ़ेसबुक आणि whatsapp वर कसे पाठवता येतील यातच सारे मग्न असतात.माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक कल्याण मधे घडलेली घटना,
कल्याण स्टेशन परिसरात एक वृद्ध महिला बेशुध्द अवस्थेत नागरिकांना आढळली तीला कुणी मदत न करता तेथून लोकांची येजा चालूच होती.काही वेळानंतर ही घटना स्थानिक रेल्वे पोलीसांना कळली. पण ते अशा लावारिस वृद्ध महिलेला जातीने लक्ष घालून ताबडतोब दवाखान्यात नेतील तर ते पोलीस कसले ? त्यांनी एका हमलाला बोलवून त्याला सरकारी हॉस्पिटल मधे घेऊन जाण्याची आज्ञा केली.पण जेंव्हा डॉक्टरने त्या वृद्ध महिलेला अॅडमिट करुन घेतले नाही तेंव्हा त्या हमलाने त्या वृद्ध महिलेस फुटपाथच्या कडेला भर पावसात सोडून दिले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याने हळहळ व्यक्त करण्या पलीकडे काहीही केले नाही.
असाच एक ओडिसा मधला प्रकार, एका वृद्ध महिलेचा एक्सप्रेस गाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाला.कित्येक तास तिचा मृतदेह तसाच पडून राहीला.शेवटी रेल्वे  कर्मचारी येऊन त्यांने आपण विचारही करू शकत नाही अशा अमानुष प्रकारे तिची लाश घेऊन गेले.  मृतदेह बराच वेळ पडून असल्या कारणाने ताठ झाला होता त्याला रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी काही साधन उपलब्ध नसल्या कारनाने त्या महिलेच्या पाठीचा कणा मोडून तीला गोळामोळा करुन एका कपड्यात बांधून घेऊन गेले.हे कृत्ये करतांना त्यांच्या डोक्यात थोडाही विचार नाही आला की, आपण ज्याच्या पाठीची हाडे मोडतो ती भेड़ बकरी नसून महिला आहे.
हल्ली घडलेली ओडिशातील घटनेने तर माणुसकीची सीमाच ओलांडली. T B या बीमारीने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्या कारणाने हॉस्पिटलने त्याला रुग्णवाहीका देण्यास नकार दिला. पत्नी मरणपावल्याचे दुःख आणि गरीबीने केलेल्या दैन्यअवस्थेत सापडलेला" दाना माझी" याने त्याच्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन आपल्या गावी चाळीस किलोमीटर नेण्याचे ठरवले.रस्त्याने बघणाऱ्या शेकडो लोकांनी त्याच्या मजबूरीचा आणि दुःखाचा फोटो काढण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही.
देशातील अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बातम्या वाचून मन सुन्न होते आणि मनात विचार येतो,
खरच माझा देश बदलतो आणि या बदलत्या देशात माणुसकीला थारा नाही.

संजय बनसोडे
भीम लेखणी विचारपीठ
http://bhimlekhani.blogspot.com

डॉ बाबासाहेब आंबेडकर

"डॉ बाबासाहेब आंबेडकर " एक न मावळणारा सूर्य. एक न शमणारं वादळ.एक मूर्तिमंत बंड चातुर्वर्णाच्या चीरेबंदी भिंतींना तेजाने कडाडून हादरा देणारी तेजस्वी वीज.
हजारो वर्षे हिंदू समाजाने लाथाडलेल्या अस्पृश्य समाजाला जागे करुन त्यांच्या गोठलेल्या रक्तात ज्वालामुखीच्या लाव्हा ओतून प्रस्थापित समाजा विरोधात बंड करायला लावणारी एक महान विभूति. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जेवढे लिहावे जेवढे वाचावे तेवढे कमीच. बाबासाहेबांचे विचार व लेखणी  त्या अथांग महासागरासारखी विशाल आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर जुलमी सत्तेविरूद्ध आणि ढोंगी विषमतेविरुद्ध लढत राहिले. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षाही त्यांना अस्पृश्य वर्गाचे स्वातंत्र्य महत्वाचे वाटत होते. देशाला स्वतंत्र मिळाल्या नंतरही जर अस्पृश्य समाज असाच गुलामीच्या खाइत खितपत पडलेला असेल तर मिळालेले स्वातंत्र्य भांडवलदार आणि स्पृश्य समाज हस्तगत करतील आणि अस्पृश्य समाज आणखी खोल खाइत ढकलल्या जाईल ही त्यांना भीती होती. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्या अगोदर अस्पृश्य समाजाला स्वातंत्र्य मिळणे खूप गरजेचे आहे असे त्यांना वाटत होते.
हे आंदोलन करतांना सतत बाबासाहेबांना हिंदूच्या छळाला व अपमानाला सामोरे जावे लागले. स्पृश्य हिंदू बाबासाहेबांना इंग्रजाचे हस्तक आणि हिंदूचे दुश्मन समजून त्यांच्यावर हल्ला चढवत. पण बाबासाहेब त्यांनी केलेल्या टिकेची व विटंबनेने थोडेही न डगमगता आपले आंदोलन सतत चालूच ठेवले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मूर्तिपूजक नव्हते तर त्या मूर्त्या फोडून टाकण्यावर त्यांचा विश्वास होता.परंतु हजारो वर्षापासून आपल्या देशाला धर्मातल्या महापुरुषाना देवत्व बहाल करुन पूजन्याची सवयच जडली होती, त्यांची शिकवण चांगली असो या वाईट पण त्यांचे एक ना एक वाक्य त्यांच्या भक्तांसाठी सर आँखों पर असे. जर त्यांच्या महापुरुषाविरुद्ध कुणी जात असेल, त्यांनी सांगितलेले चूक ठरवत असेल तर त्यांना त्या महापुरुषाच्या भक्ताकडून छळ,कपट,शिव्यागाळ यांना सामोरे जावे लागत असे.अशा भयमय वातावरणात कुणी विरोधक तग धरून रहात  नसे.एक तर तो त्याला शरण जात असे नाहीतर मैदान सोडून पळून जात असे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर याला अपवाद होते. आंबेडकर नावाचा हा विद्रोहाचा दिवा तूफ़ान वादळात ही जळणारा आणि पाण्यात ही पेटणारा होता.वादळ वाऱ्यासारखा दुश्मनाने त्यांच्या भोवती कितीही गोंगाट घातला तरी विजेसारखा कडाडून ते आपल्या तेजस्वी ज्ञानाचे दर्शन घडवित असत. त्या काळात धर्माने  देवत्व बहाल केलेली मूर्ती  म्हणजे  महात्मा गांधी , या मूर्तीला  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धारधार लेखणीला हातोडा करुन फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेबांना त्यांचे भक्त व  स्पृश्य हिंदू  देशद्रोही व इंग्रजाचा हस्तक म्हणत. बाबासाहेबांच्या अभ्यासक टीकेला उत्तर देण्यास सहसा कुणी धजावत नसे. बाबासाहेबांच्या भेदक माराने दुश्मन नुसते तडफडत असत,कारण त्यांना प्रतीउत्तर देणे जमत नसे.त्यांच्या दुश्मनालाही बाबासाहेबांचे विशाल बौद्धिक सामर्थ्य माहीत असल्यामुळे ते त्यांच्या टिकेला प्रतीउत्तर न देता त्यांना शिव्या देण्यातच धन्यता मानीत.
बाबासाहेब अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून देशाला एकसंध करण्यासाठीच धरपडत राहिले.प्रांताच्या संस्कृतीशी ते कधीच चीटकून राहिले नाही.अखंड भारत देशातच आपले कल्याण आहे. असे ते नेहमी सांगत.एक देश,एक भाषा,एक संस्कृती हा महामंत्र ते नेहमी जपत. ते एकदा  सभेला संबोधित करतांना म्हणाले, प्रांतिक भाषेची मागाहून व्यवस्था होऊ शकते पण आधी देशाला एका भाषेत बोलायला शिकवा आणि बघा काय चमत्कार होतो.
हिंदू समाज बाबासाहेबांना त्या काळी हिंदू धर्माचा कट्टर शत्रु मानत होता. बाबासाहेब नेहमी हिंदुतील अनिष्ट रुढी परंपरा विरोधात टीका करत असत त्यांनी हिंदू धर्माचा मनुस्मृती हा ग्रंथ रायगडच्या पायथ्याशी जाळला तेंव्हापासून तर हा द्वेष आणखी वाढत गेला.परंतु बाबासाहेब हे हिंदू धर्माचे शत्रु नसून मित्र होते हे काही हिंदूंना आजपर्यंतही समजले नाही.बाबासाहेबांना हिंदू धर्मातला चातुर्वर्ण नाहीसा करुन,त्यातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करून  हिंदू धर्म मानव कल्याणासाठी परिपूर्ण करायचा होता. ते आपल्या भाषणात सांगत, हिंदू धर्मातून चातुर्वर्ण नाहीसा करून हिंदू धर्माची रचना समतेच्या आणि लोक हिताच्या पायावर उभी करा. पण हे हिंदू धर्माचे ठेकेदार बाबासाहेबांचे (एका शूद्राचे) ऐकतील ते हिंदू कसले ?
बाबासाहेबांना हिंदू समाजाचा सूड घ्यायचा नव्हता.जर त्यांना सूड घ्यायचा असता तर त्यांनी या मातीतला आणि आपल्या पूर्वजांचा धर्म स्वीकारण्या पेक्षा परकीयांचा धर्म स्वीकारून त्यांच्यावर सूड उगवला असता. ते एकदा म्हणाले होते,मी आणि माझे अनुयायी जर मुसलमान झालो असतो तर कोट्यवधी रुपये आमच्या समाजाच्या पायावर ओतल्या गेले असते.माझ्या मनात जर असा सूड आणि द्वेष असता तर  मी पाच वर्षाच्या आत या देशाचे वाटोळे केले असते.पण मी या देशाचा आणि हिंदूंचा दुश्मन नसून एक सच्चा देशप्रेमी आहे हे आज ना उद्या देशाला कळेलच. आणि खरच बाबासाहेबांनी देशाची घटना लिहून ते एक सच्चे देशभक्त आणि राष्ट्रनिर्माते आहेत याचा देशाला पुरावा दिला.

भीम लेखणी विचारपीठ
संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

नीळी हंडी कुणाची ??

दही हंडीच्या गोविंदा पथकात आपलेही  मुले पुष्कळ असतात.

मुम्बईत गावागावातून आलेल्या लोकांनी आपला समाज बघून घरे घेतली नाही तर आपआपल्या  ऐपतीप्रमाणे घरे घेऊन स्थायिक झाले.
माझ्या घराशेजारी ब्राह्मण आहे बाजूला आगरी आहे असे अनेक जातीधर्माची व्यक्ती  आपल्याला एकाच विभागात  बघायला मिळतात त्यांच्यात सख्या भावाप्रमाणे प्रेम असते.
माणूस म्हणून कुणी दुसऱ्या व्यक्तीजवळ जातो त्याला माणूस म्हणूनच तो मदत करतो.तेंव्हा तो त्याला त्याची जात धर्म विचारीत नाही.मुम्बईत सर्व जाती धर्मांचे माणसे एकत्र येऊन सर्व उत्सव आनंदाने साजरे करतात.
दही  हंडीत आपले मुले भाग घेतात त्याला हेच एक कारण आहे.तुम्हांला गावात हे चित्र बघायला मिळणार नाही.
हिंदू मित्रासोबत  त्यांच्या सणात भाग घेणे वेगळे पण, जर कुणी आपल्या समजातील व्यक्ती बाबासाहेबांच्या नावावर आणि बौद्ध धम्माच्या नावावर जर हिंदू सण साजरे करीत असेल तर त्याला विरोध करावाच लागेल.नाहीतर हिंदू धर्मग्रंथात सांगितल्या प्रमाणे बुद्ध हा विष्णूचा अवतार बनूनच राहील.
संजय बनसोडे

सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

आम्ही भीम क्रांतीचे दिवे

आम्ही भीम क्रांतीचे दिवे ....

बंदूकधारी चालवी,तुझ्या विचारांवर गोळी
त्या बंदुकीच्या गोळीत, आम्ही नव्हे.

झालीं किती समाजात, गद्दाराची टोळी
त्या गद्दारांच्या टोळीत, आम्ही नव्हे.

करीत आहेत तुझ्या ते,लेखणीची होळी
त्या जळणाऱ्या होळीत,आम्ही नव्हे.

नावाने तुझ्या, भीक मांगती गल्ली बोळीत
टाकणारे त्याच्या झोळीत,आम्ही  नव्हे.

स्वार्थासाठी आपल्या,तो मनुदरबारी लोळी
त्या लोळणाऱ्या टोळीत,आम्ही नव्हे.

गुलामीने बरबटलेली, ते खाती आजही पोळी
आमची आत्मसम्मानांची पोळी,ती नव्हे.

भीम लेखणी जपणारे, भीम विचार पेरणारे
आम्ही भीम पाखरांचे थवे !

तूफ़ानात ही पेटणारे,पाण्यात ही जळणारे
आम्ही भीम क्रांतीचे दिवे !

संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

मूर्ती

मूर्तीत सारे दंग, जगी मूर्तीचाच रंग
कुणी मूर्तीच्या संग, कुणा मूर्तीचा पाबंद !!

मूर्तीसाठी शुद्ध, मूर्तीसाठी दूध
मूर्तीसाठी युद्ध, मूर्तीसाठी प्रतिबद्ध !!

मूर्तीला रोकडं, मूर्तीला बोकडं
खांद्यावर जोखडं, त्यात मूर्ती अवजडं !!

असता आवस, होती नवस
मूर्तीला नैवेद, रात दिवस !!

दगडाची मूर्ती, लोखंडाची मूर्ती
चांदीची मूर्ती, दिसे सोन्याची मूर्ती !!

मूर्तीला ac, मूर्तीला pc
मूर्तीची स्तुती, देती मूर्तीला देशी !!

मूर्तीचा भास, मूर्तीचा ध्यास
मूर्तीचा ठेकेदार, मोजी पैशाची रास !!

मूर्तीसाठी सुरक्षा, मूर्तीसाठी दीक्षा
मूर्तीची प्रतीक्षा, होई मूर्तीसाठी शिक्षा !!

मूर्तीच्याच पाया, मूर्तीचीच साया
मूर्तीचीच माया, जगी या !!

काय सांगू संजय, करी मूर्तीचाच जय
होई मूर्तीचाच विजय, लागे मूर्तीचेच भय !!

कवी - संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

वादळवारा ........

सूर्यही नव्हता चंद्रही नव्हता
नव्हता तो रं तारा
वादळवारा ..........
वादळवारा सुसाटणारा
भीम ज्वालामुखी अंगारा !!

बघून धरणी थरथर कापे
लाव्हाचा हुंकारं
ऐकून वाणी आकाश फाटे
अशी ती भीम ललकारं
पाण्यालाही आग लावली
होता ज्वलंत तो निखारा
वादळवारा ...................!!

वीज होऊनी क्षणात करी
दुश्मनावरी वार
दिन दलितांसाठी तो लढला
करुन पेनाला तलवार
दिन दुबळ्यांचा झाला दाता
दिला तयांना थारा
वादळवारा ....................!!

मनुवादाला मातीत गाड़णारा
होता मर्दानी तो नर
नतमस्तक होऊन भीमचरणी
झुकती संजयाचे कर
अभिमानाने सन्मानाने
देती जय भीम सारे नारा
वादळवारा .................
वादळवारा सुसाटणारा
भीम ज्वालामुखी अंगारा !!

संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

गोहत्येच्या नावाखाली .........

गोहत्येच्या नावाखाली,तुझा दलित हा मरतो
तू काय करतो घरी रं लेका तू काय करतो ?

तुझ्या पूर्वजांचे काम,गळतो घाम तरी ना दामं
हे वंशपरंपरेचं देणं, झालं जीवन तुझं हरामं !
मनुवादी जात्यामंधी तू रोज भरडतो
तू काय करतो घरी रं लेका तू काय करतो ?

ना केला कसला गुन्हा,तरी अन्याय पुन्हापुन्हा
मारती तुलाच जातिवादी,ती दादरी असो या उना !
धर्माच्या नावाने तुला, हा मनुवादी छळतो
तू काय करतो घरी रं लेका तू काय करतो ?

तू जातीनं चांभार,तुझा चामड्याचा व्यापार
मेहनत तुझी असे रं फार,होती कशीबशी गुजार !
उदरनिर्वाहासाठी तू आपल्या, गावोगाव भटकतो
तू काय करतो घरी रं लेका तू काय करतो ?

रेडिकल आंबेडकराचा, बन आता तू चेला
आज भ्याला तर गेला, तू फुकटामंधी मेला !
बंड करुनी गुंड बन, तुला संजय हा बोलतो
तू काय करतो घरी रं लेका तू काय करतो ?

संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

आदिवासी दिनांनिमित्त

आदिवासी दिनानिमित्त .........🖋

जातीवर होणारे हल्ले आणि आदिवासी समुदायावर होणारे हल्ले.

एखाद्या विशिष्ट जातीवर होणारा हल्ला (मंग ती जात वरची  असो का खालची  )किंवा त्या जातींतील महिलेवर होणारा अत्याचार किंवा बलात्काराचे तीव्र प्रतिसाद उमटतांना दिसतात. पण जेंव्हा आदिवासी समुदायावर असे हल्ले होतात त्यांच्या स्त्रीयांवर बलात्कार होतात त्याची सादी  माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोचत नाही जरी पोचली तर कोणतीही संघटना त्याविरूध्द आवाज उठवतांना दिसत नाही.
असे का ?
"जात"
जात ही अशी गोष्ट आहे ती मानवी मेंदूतून जाता जात नाही. माणूस खेड्यात असो शहरात असो वा विदेशात असो तो आपली जात विसरत नाही. जेंव्हा जेंव्हा त्याच्या जातीवर हल्ला होतो तेंव्हा तेंव्हा खेड्यात,शहरात,विदेशात असलेले सुशिक्षित अशिक्षित सारेच पेटून उठतात आणि सरकारला दोषीवर कार्यवाही करायला भाग पाडतात. मुळात आपले राजकारण हे जातीवरच अवलंबून आहे.  उमेदवाराची जात बघूनच येथे पक्षाची  उमेदवारी दिली जाते.आणि तो उमेदवार आमदार खासदार होवो अगर न होवो तो शेवटपर्यंत आपल्या जातीशी बांधील असतो.

आदिवासी
आदीवासी दुर्गम जंगली भागत राहणारा समुदाय जो  शिक्षणापासून वंचित आहे. जो  या युगातील सोय सुविधा पासून वंचित आहे जो छोट्या छोट्या जातीचा समूह आहे. काही काही भागातील आदिवासी समुदाय तर मतदानाच्या हक्कापासून वंचित आहेत. आदिवासी हा जंगली दुर्गम भागात राहणारा जनसमूह. या समूहातून जो बाहेर शहरात वसतो तो या समुदायातून तुटला जातो. जेंव्हा जेंव्हा त्यांच्यावर हल्ले होतात तेंव्हा तेंव्हा त्यांचा आवाज त्या जंगलातच दबल्या जातो. हीरो हिरोईनचे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लाइव्ह टेलिकास्ट करणाऱ्या मीडियाला आदिवासी समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची भनक सुध्दा लागत नाही.
हाच फरक आहे जातीवर होणाऱ्या हल्ल्यात आणि आदिवासी समुदायावर होणाऱ्या हल्ल्यात.
आज "आदिवासी दिन "नुसते शुभेच्छा देऊन काही होणार नाही तर त्यांचे दुःख त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी व तिथपर्यंत शिक्षण व दुसऱ्या सुविधा  पोचण्यासाठी आपण आवाज उठवायला पाहिजे.

संजय बनसोडे

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

गाय आणि राजकारण


लेखक -संजय बनसोडे
 navi Mumbai
गोरक्षणाच्या नावाखाली दलितांवर होणाऱ्या अत्याचारामुळे पंतप्रधान व्यथित झाले असून, जर कोणाला हल्ला करायचाच असेल तर तो माझ्यावर करा.जर तुम्हांला गोळी झाडायचीच असेल तर माझ्यावर झाडा.
हे पंतप्रधान मोदीचे विधान गोहत्याच्या नावाखाली गोरक्षकाकडून होणारे अत्याचार थांबवण्यासाठी नसून येणाऱ्या निवडणुकीत दलितांचे मते भाजपकडे वळवण्यासाठी आहेत.
आजचे युग हे विज्ञान युग आहे.गरीब माणसांच्या खिशात ही आज मोबाईल आला आहे.आज जगभरातली माहिती त्याला एका क्षणातच मिळते.वर्षानुवर्ष चालत आलेल्या भाकड कथांवर आम्ही आता विश्वास ठेवत नाही.या इंटरनेट युगात, ऐकेकाळी आमच्यावर होणारा अन्याय अत्याचार दाबणारा मनुवादी मीडिया ही आता काही करू शकत नाही.कारण,सोशियल मीडियाच आज आमच्या हातात आला. आज आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला आम्हीच वाचा फोडत आहोत. आमच्यावर होणारे अन्याय जगाला दाखवायला आज आम्ही सक्षम आहोत.
जेंव्हापासून मोदी पंतप्रधान झाले आहेत तेंव्हापासून दलितांवर  होणारे अन्याय झपाट्याने वाढत आहेत. हिंदूराष्ट्र आणि गोरक्षाच्या नावावर काही हिंदुत्ववादी संघटना उन्माद माजवत आहेत. जेंव्हापासून भाजप (RSS) चे सरकार आले आहे तेंव्हापासून साऱ्याच छोट्या मोठ्या  हिंदुत्ववादी संघटना बिळ्यातून बाहेर येऊन दलित व मुस्लिमांवर हल्ले करीत आहेत.गोरक्षणाच्या नावावर गोरक्षकाकडून होणारे हल्ले काही नवीन नाहीत. पण उना येथील अत्याचारानंतर स्फोटच झाला.शहर असो या गाव वाऱ्यासारखी ही न्यूज़ पसरली.उना येथील दलितांवर मेलेल्या  गायीचे  चामडे काढताना गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीचे देशात तीव्र पडसाद उमटले. दलित हत्याप्रकरणी मूंग गिळून गप्प बसलेल्या  सरकारला जेंव्हा अमेरिकेने खडसावले तेंव्हा मोदीला जाग आली आणि गोरक्षका विरोधात त्यांनी विधान केले.
या अत्याचार विरुद्ध निषेध सभेत गोरक्षकाचा निषेध करीत 20 जणांनी विष प्याले त्यातील एकाचा मृत्यु झाला. या कथित गोरक्षकांचा तातडीने बंदोबस्त केला नाही तर दोन वर्गातले हे तेढ उफाळून दंगलीत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. या गोरक्षकांने केवळ गुजरात मधेच नाही तर संपूर्ण देशामधे धुमाकूळ घातला आहे. प्लेग सारखा यांचा संसर्ग तेजीने देशात फैलत आहे. यांना मोदीचे सरकार आहे म्हणून चित भी अपनी पट भी अपनी असेच वाटू लागले आहे. या उंदीरांचा  ताबडतोब बंदोबस्त या मोदी सरकारने केला पाहिजे.
हे गोरक्षक याच भाजप प्रणीत हिंदुत्ववादी संघटनेशी संबधित असतात.
या गोरक्षकांनी झारखंड राज्यात म्हैसी विकण्यास घेऊन  जाणाऱ्या मुस्लिमांची हत्या केली. दादरी येथे गोमांस संशयावरून मोहम्मदची हत्या केली.गोमांस घेऊन जात आहेत या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मारहाण केली.गोरक्षकांचे या दोन वर्षात सतत असे कुठे ना कुठे अत्याचार सुरूच असतात. दिवसेंदिवस त्यांची हिम्मत वाढत आहे. आम्ही मोठे देशभक्तीचे काम करीत आहोत असेच त्यांना वाटते म्हणूनच उना येथे त्यांनी अत्याचारी कृत्ये करतांना त्याचा वीडियो ही काढला.
गाय ही दुसऱ्या प्राण्यासारखीच. जशी म्हैस दूध देते तशीच गाय ही पण, हिंदूधर्मशास्त्रात तिला पूजनीय मानली म्हणूनच हिंदुत्ववादी संघटनेचे गोरक्षक दलितांवर व मुस्लिमांवर अत्याचार करतात. जेंव्हापासून महाराष्ट्र सरकारने गोहत्या बंदी लागू केली तेंव्हापासून गोरक्षक जास्तच  आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र प्राणी संवर्धन (1976) कायद्यानुसार गायीच्या कत्तलीवर या पूर्वीच बंदी आणण्याचा प्रयत्नं झाला होता.1995 साली सेना -भाजप सरकारने हे विधेयक मंजूरीसाठी सरकारकडे पाठवले होते.पण rss चे सरकार आल्यानंतर हे विधेयक त्वरित पास झाले.
"गाय पवित्र कशी झाली ?
सवर्ण हिंदू गोमांस भक्षण करीत होते का ?
यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर लिहतात, ऋग्वेदात म्हटले आहे की,जी गाय दूध देते तिची हत्या करू नये.इंडो-आर्यन्स समुदायासारख्या प्राचीन कृषी संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या मधे गाय ही संपत्तीची प्रतीक होती.म्हणूनच तिची पूजा केली जात असे व तिला पवित्र मानले जात असे.असे असले तरीही आर्यांनी व्यवहारवादी वर्तन केंद्रस्थानी ठेवून गायीचे मांस अन्न म्हणून भक्षण केले.खरेतर गाय पवित्र असल्याकारणानेच तिची हत्या करण्यात येत असे.वैदिक काळातही गाय पवित्र होती. ऋग्वेदाच्या अनेक ऋंचा मधे असे स्पष्ट दिसून येते की,ऋग्वेद कालीन आर्य तलवार किंवा कूऱ्हाडीने बैल व गायीची हत्या करीत आणि त्याचे मांस अन्न म्हणून सेवन करीत.प्राचीन काळी महत्वाच्या अतिथिला गोमांस देण्याची प्रथा होती.अतिथीसाठी गोहत्या करणे इतके टोकाला गेले की,अतिथीला गायीचा खूनी म्हणण्यात येऊ लागले.
पुढे बौद्ध धर्म आल्यावर, बौद्धधर्मावर कुरघोडी करण्यासाठी व त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी ब्राम्हण वर्गाने अत्यंत चाणाक्षपणे बौद्ध धर्मातील निश्चित अशा काही सिद्धांताचा स्वीकार करून शाकाहाराचे आपण खरे भोक्ते असल्याचे दावे केले.आणि गायीला पूजण्यास सुरवात केली."
आपल्या देशात हिंदू पुष्कळ असल्यामुळे त्यांनी काढलेले हुकुम हे अल्पसंख्यकांने मान्य केलेच पाहिजे नाहीतर गोरक्षक, हिंदुत्ववादी संघटना तुम्हांला देशद्रोही ठरवून तुमच्यावर अत्याचार करतील तुमच्या हत्या करतील. गायीची पूजा करणे ही प्रथा प्राचीन व माध्ययुगीन कृषीसंस्कृती असलेल्या अर्थव्यवस्थेतून उदयास आली.कारण, गायीपासून पोषक दूध व शेतीची मशागत करण्यासाठी बैल मिळत असे. त्याचा धर्माशी कसलाही संबध नाही.मोदी जसे गोरक्षका विरोधात बोलले तसे ताबडतोब त्यांच्या विरोधात पाऊल ही उचलावे व अत्याचार करणाऱ्या कथित गोरक्षकांवर कार्यवाही करून त्यांना गजाआड करावे व त्यांच्या संघटनेवर बंदी घालावी.

ब्राम्हणवादी मलेरिया

ब्राम्हणवादी मलेरियाने
मारल्या माझ्या लढाऊ पेशी

दोष त्याला कसा देऊ ?
त्याला मीच होतो दोषी !

आला मच्छर चावला मला
घुसला जीवाणु रक्तात

मारून अणुरेणु विद्रोहाचे
त्याने परिवर्तित केले भक्तात !

आता, शोधत आहे मी डॉक्टर
जो पुन्हा लढाऊ पेशी चढवेल

रक्तारक्तात घुसलेला ब्राम्हणवाद
तो विद्रोही शब्दाने बडवेल !

संजय बनसोडे

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

झूठी हैं आज़ादी

झूठी है आज़ादी, झूठा यह जश्न है
सत्ता है मनुवादी, वही पुराना रस्म है !!

कही बलात्कार कही अत्याचार
कही हो रहे दंगे
भूखा इंसान, दुखी किसान
गरीबों के बच्चे नंगे !

हर भेड़ीया नोचता यहाँ,भारत माता का जिस्म है
सत्ता है मनुवादी, वही पुराना रस्म  है !!

दलित नक्सली, मुस्लिम आतंकी
हिंदू हो गया दाता
कटता इंसान, रोती संतान
सुरक्षित सिर्फ़ गो माता !

दलित मुस्लिमपर हुकुमत करना,गोधारी तिलिस्म है
सत्ता है मनुवादी, वही पुराना रस्म है !!

ना मिले रोटी, ना सलामत बेटी
भांडवलशाही राज है
गरीब कमाये और अमीर खाये
जो कल था वही आज है !

मजदूरों के कमाईपर,हररोज इनका जश्न है
सत्ता है मनुवादी, वही पुराना रस्म  है !!

धर्मों का आटा, जहरीला साठा
पिसे पिस न जाय
छोड़ो धर्म जाती,धरो इंसानियत नाती
कौन यहाँ कहलाए !

जाती जाती का झगड़ा यहाँ,एकता यहाँ विघ्न हैं
सत्ता हैं मनुवादी, वही पुराना रस्म हैं !!

संजय बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...