लेखक -संजय बनसोडे
navi Mumbai
गोरक्षणाच्या नावाखाली दलितांवर होणाऱ्या अत्याचारामुळे पंतप्रधान व्यथित झाले असून, जर कोणाला हल्ला करायचाच असेल तर तो माझ्यावर करा.जर तुम्हांला गोळी झाडायचीच असेल तर माझ्यावर झाडा.
हे पंतप्रधान मोदीचे विधान गोहत्याच्या नावाखाली गोरक्षकाकडून होणारे अत्याचार थांबवण्यासाठी नसून येणाऱ्या निवडणुकीत दलितांचे मते भाजपकडे वळवण्यासाठी आहेत.
आजचे युग हे विज्ञान युग आहे.गरीब माणसांच्या खिशात ही आज मोबाईल आला आहे.आज जगभरातली माहिती त्याला एका क्षणातच मिळते.वर्षानुवर्ष चालत आलेल्या भाकड कथांवर आम्ही आता विश्वास ठेवत नाही.या इंटरनेट युगात, ऐकेकाळी आमच्यावर होणारा अन्याय अत्याचार दाबणारा मनुवादी मीडिया ही आता काही करू शकत नाही.कारण,सोशियल मीडियाच आज आमच्या हातात आला. आज आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला आम्हीच वाचा फोडत आहोत. आमच्यावर होणारे अन्याय जगाला दाखवायला आज आम्ही सक्षम आहोत.
जेंव्हापासून मोदी पंतप्रधान झाले आहेत तेंव्हापासून दलितांवर होणारे अन्याय झपाट्याने वाढत आहेत. हिंदूराष्ट्र आणि गोरक्षाच्या नावावर काही हिंदुत्ववादी संघटना उन्माद माजवत आहेत. जेंव्हापासून भाजप (RSS) चे सरकार आले आहे तेंव्हापासून साऱ्याच छोट्या मोठ्या हिंदुत्ववादी संघटना बिळ्यातून बाहेर येऊन दलित व मुस्लिमांवर हल्ले करीत आहेत.गोरक्षणाच्या नावावर गोरक्षकाकडून होणारे हल्ले काही नवीन नाहीत. पण उना येथील अत्याचारानंतर स्फोटच झाला.शहर असो या गाव वाऱ्यासारखी ही न्यूज़ पसरली.उना येथील दलितांवर मेलेल्या गायीचे चामडे काढताना गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीचे देशात तीव्र पडसाद उमटले. दलित हत्याप्रकरणी मूंग गिळून गप्प बसलेल्या सरकारला जेंव्हा अमेरिकेने खडसावले तेंव्हा मोदीला जाग आली आणि गोरक्षका विरोधात त्यांनी विधान केले.
या अत्याचार विरुद्ध निषेध सभेत गोरक्षकाचा निषेध करीत 20 जणांनी विष प्याले त्यातील एकाचा मृत्यु झाला. या कथित गोरक्षकांचा तातडीने बंदोबस्त केला नाही तर दोन वर्गातले हे तेढ उफाळून दंगलीत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. या गोरक्षकांने केवळ गुजरात मधेच नाही तर संपूर्ण देशामधे धुमाकूळ घातला आहे. प्लेग सारखा यांचा संसर्ग तेजीने देशात फैलत आहे. यांना मोदीचे सरकार आहे म्हणून चित भी अपनी पट भी अपनी असेच वाटू लागले आहे. या उंदीरांचा ताबडतोब बंदोबस्त या मोदी सरकारने केला पाहिजे.
हे गोरक्षक याच भाजप प्रणीत हिंदुत्ववादी संघटनेशी संबधित असतात.
या गोरक्षकांनी झारखंड राज्यात म्हैसी विकण्यास घेऊन जाणाऱ्या मुस्लिमांची हत्या केली. दादरी येथे गोमांस संशयावरून मोहम्मदची हत्या केली.गोमांस घेऊन जात आहेत या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मारहाण केली.गोरक्षकांचे या दोन वर्षात सतत असे कुठे ना कुठे अत्याचार सुरूच असतात. दिवसेंदिवस त्यांची हिम्मत वाढत आहे. आम्ही मोठे देशभक्तीचे काम करीत आहोत असेच त्यांना वाटते म्हणूनच उना येथे त्यांनी अत्याचारी कृत्ये करतांना त्याचा वीडियो ही काढला.
गाय ही दुसऱ्या प्राण्यासारखीच. जशी म्हैस दूध देते तशीच गाय ही पण, हिंदूधर्मशास्त्रात तिला पूजनीय मानली म्हणूनच हिंदुत्ववादी संघटनेचे गोरक्षक दलितांवर व मुस्लिमांवर अत्याचार करतात. जेंव्हापासून महाराष्ट्र सरकारने गोहत्या बंदी लागू केली तेंव्हापासून गोरक्षक जास्तच आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र प्राणी संवर्धन (1976) कायद्यानुसार गायीच्या कत्तलीवर या पूर्वीच बंदी आणण्याचा प्रयत्नं झाला होता.1995 साली सेना -भाजप सरकारने हे विधेयक मंजूरीसाठी सरकारकडे पाठवले होते.पण rss चे सरकार आल्यानंतर हे विधेयक त्वरित पास झाले.

"गाय पवित्र कशी झाली ?
सवर्ण हिंदू गोमांस भक्षण करीत होते का ?
यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर लिहतात, ऋग्वेदात म्हटले आहे की,जी गाय दूध देते तिची हत्या करू नये.इंडो-आर्यन्स समुदायासारख्या प्राचीन कृषी संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या मधे गाय ही संपत्तीची प्रतीक होती.म्हणूनच तिची पूजा केली जात असे व तिला पवित्र मानले जात असे.असे असले तरीही आर्यांनी व्यवहारवादी वर्तन केंद्रस्थानी ठेवून गायीचे मांस अन्न म्हणून भक्षण केले.खरेतर गाय पवित्र असल्याकारणानेच तिची हत्या करण्यात येत असे.वैदिक काळातही गाय पवित्र होती. ऋग्वेदाच्या अनेक ऋंचा मधे असे स्पष्ट दिसून येते की,ऋग्वेद कालीन आर्य तलवार किंवा कूऱ्हाडीने बैल व गायीची हत्या करीत आणि त्याचे मांस अन्न म्हणून सेवन करीत.प्राचीन काळी महत्वाच्या अतिथिला गोमांस देण्याची प्रथा होती.अतिथीसाठी गोहत्या करणे इतके टोकाला गेले की,अतिथीला गायीचा खूनी म्हणण्यात येऊ लागले.
पुढे बौद्ध धर्म आल्यावर, बौद्धधर्मावर कुरघोडी करण्यासाठी व त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी ब्राम्हण वर्गाने अत्यंत चाणाक्षपणे बौद्ध धर्मातील निश्चित अशा काही सिद्धांताचा स्वीकार करून शाकाहाराचे आपण खरे भोक्ते असल्याचे दावे केले.आणि गायीला पूजण्यास सुरवात केली."

आपल्या देशात हिंदू पुष्कळ असल्यामुळे त्यांनी काढलेले हुकुम हे अल्पसंख्यकांने मान्य केलेच पाहिजे नाहीतर गोरक्षक, हिंदुत्ववादी संघटना तुम्हांला देशद्रोही ठरवून तुमच्यावर अत्याचार करतील तुमच्या हत्या करतील. गायीची पूजा करणे ही प्रथा प्राचीन व माध्ययुगीन कृषीसंस्कृती असलेल्या अर्थव्यवस्थेतून उदयास आली.कारण, गायीपासून पोषक दूध व शेतीची मशागत करण्यासाठी बैल मिळत असे. त्याचा धर्माशी कसलाही संबध नाही.मोदी जसे गोरक्षका विरोधात बोलले तसे ताबडतोब त्यांच्या विरोधात पाऊल ही उचलावे व अत्याचार करणाऱ्या कथित गोरक्षकांवर कार्यवाही करून त्यांना गजाआड करावे व त्यांच्या संघटनेवर बंदी घालावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा