मेरा देश बदल रहा हैं ...?
खरोखरच माझा देश बदलतोय.येथे सर्वांनी आपली माणुसकी गहाण ठेवून स्वार्थाच्या बूरख्यात वावरताना सर्व आपल्या अहंकारातच तल्लीन झाले आहेत.
माणुसकीच्या नात्याने जवळ येताना आज कुणी दिसतच नाही. जिथे फायदा आहे तिथेच लाळ गाळायची सर्वांना सवयच लागली.दुःखात दारिद्रय़ात असणाऱ्यांचा आज कुणी वालीच उरला नाही.आजकाल तर मानवतेची हत्या करणारे प्रकरण जागोजागी दिसत आहेत. असह्य वेदनाने तळमळणाऱ्यांना तात्काळ मदत करुन दवाखान्यात पोचवण्यापेक्षा त्रासाने विवळत असलेल्या पीड़ित व्यक्तीचे मोबाईल मधे फोटो काढून फ़ेसबुक आणि whatsapp वर कसे पाठवता येतील यातच सारे मग्न असतात.माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक कल्याण मधे घडलेली घटना,
कल्याण स्टेशन परिसरात एक वृद्ध महिला बेशुध्द अवस्थेत नागरिकांना आढळली तीला कुणी मदत न करता तेथून लोकांची येजा चालूच होती.काही वेळानंतर ही घटना स्थानिक रेल्वे पोलीसांना कळली. पण ते अशा लावारिस वृद्ध महिलेला जातीने लक्ष घालून ताबडतोब दवाखान्यात नेतील तर ते पोलीस कसले ? त्यांनी एका हमलाला बोलवून त्याला सरकारी हॉस्पिटल मधे घेऊन जाण्याची आज्ञा केली.पण जेंव्हा डॉक्टरने त्या वृद्ध महिलेला अॅडमिट करुन घेतले नाही तेंव्हा त्या हमलाने त्या वृद्ध महिलेस फुटपाथच्या कडेला भर पावसात सोडून दिले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याने हळहळ व्यक्त करण्या पलीकडे काहीही केले नाही.
असाच एक ओडिसा मधला प्रकार, एका वृद्ध महिलेचा एक्सप्रेस गाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाला.कित्येक तास तिचा मृतदेह तसाच पडून राहीला.शेवटी रेल्वे कर्मचारी येऊन त्यांने आपण विचारही करू शकत नाही अशा अमानुष प्रकारे तिची लाश घेऊन गेले. मृतदेह बराच वेळ पडून असल्या कारणाने ताठ झाला होता त्याला रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी काही साधन उपलब्ध नसल्या कारनाने त्या महिलेच्या पाठीचा कणा मोडून तीला गोळामोळा करुन एका कपड्यात बांधून घेऊन गेले.हे कृत्ये करतांना त्यांच्या डोक्यात थोडाही विचार नाही आला की, आपण ज्याच्या पाठीची हाडे मोडतो ती भेड़ बकरी नसून महिला आहे.
हल्ली घडलेली ओडिशातील घटनेने तर माणुसकीची सीमाच ओलांडली. T B या बीमारीने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्या कारणाने हॉस्पिटलने त्याला रुग्णवाहीका देण्यास नकार दिला. पत्नी मरणपावल्याचे दुःख आणि गरीबीने केलेल्या दैन्यअवस्थेत सापडलेला" दाना माझी" याने त्याच्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन आपल्या गावी चाळीस किलोमीटर नेण्याचे ठरवले.रस्त्याने बघणाऱ्या शेकडो लोकांनी त्याच्या मजबूरीचा आणि दुःखाचा फोटो काढण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही.
देशातील अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बातम्या वाचून मन सुन्न होते आणि मनात विचार येतो,
खरच माझा देश बदलतो आणि या बदलत्या देशात माणुसकीला थारा नाही.
संजय बनसोडे
भीम लेखणी विचारपीठ
http://bhimlekhani.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा