एखादा उच्च जातीचा आहे म्हणून त्याच्यावर ॲट्रॉसिटी लागू होत नाही. जर तो गुन्हेगार आहे.त्यानी जातिवादी अत्याचारी कृत्ये केले त्यालाच ॲट्रॉसिटी लागू होते. तो गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला जातीआड लपवणे म्हणजे सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या विरुद्ध वागणे होय.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कधीच गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून महाराजांनी त्याला थारा दिला नाही तर त्याला सजाच दिली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले असे कित्येक उदाहरणे आहेत.त्यातील सर्वांना परिचयाची असणारी रांझ्याच्या पाटलाची गोष्ट,
रांझे गावच्या पाटलांने शेतकऱ्याच्या तरुण मुलीला दिवसा ढवळ्या पळवून तिच्यावर बलात्कार केला. त्या मुलीने अब्रूच्या भीतीने जीव दिला.गुन्हेगार गावचा पाटील असल्यामुळे गावकरी हळहळ व्यक्त करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकले नाही.तेंव्हा महाराज पंधरा वर्षाचे होते.त्यांच्या कानी ही गोष्ट गेली.आणि महराजांनी त्या मुजोर पाटलाचा एक हात आणि एक पाय कलम केला. ही शिक्षा पुढे स्वराज्यात चौरंग या नावाने महाराजांनी अमलात आणली.अशा शिक्षेला घाबरुन स्वराज्यातील दिन दलित,गोर् गरीब जनतेची आणि स्त्रीची अब्रू शाबूत राहली.
ज्या दलित जनतेवर आज तुमचा रोष आहे त्या दलित जनतेला स्वराज्यात महाराजांनी कशाचीही कमी पडू दिली नाही.प्रतापगडावर जेंव्हा तुळजाभवानीचे मंदिर बांधून पूर्ण झाले तेंव्हा त्या मंदिराचे बांधकाम करणारे अस्पृश्य गवंडीच्या हातून पूजा करून घेतली.स्वराज्यात निधड्या छातीने लढणार्या महार समाजातील लोकांना दीडशे पेक्षाही जास्त किल्ल्याची किल्लेदारी दिली.खरच मला कधी कधी नवल वाटते की, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन काही लोक जातिवाद करतात.
आजही स्वराज्यासारखी समाजव्यवस्था नांदवायची असेल व जातिवादी गुन्हे संपवायचे असतील तर ॲट्रॉसिटी सारख्या ॲक्टची देशाला नितांत गरज आहे.
संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा