गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

आभार पत्र

आभार पत्र

"कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघ" "पत्रकार उत्कर्ष समिती "आणि "साप्ताहिक कुष्ठमित्र "यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या "सत्कार " कार्यक्रमात यावर्षी माझ्यासारख्या छोट्या कवी /लेखकाचे, या तिन्हीही संस्थेचे पदअधिकारी व आयु. अविनाश चिंतामण म्हात्रे सरांनी निवड केल्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे.
समाजातल्या वेगवेगळ्या संस्थेमार्फत समाजात सर्वोच्च पदी पोचलेल्यांचा  गुणगौरव करणाऱ्या संस्था मोठ्या संख्येने तुम्हांला आढळतील पण कुष्ठरोगाने पीड़ित, दिन दलित,गोर गरीब जनतेची सेवा करणारी "कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघ " नेहमीच गरीबांचा विचार करीत आली आहे.
मोठ्या झाडाला जर आपण पाणी टाकले तर  तुम्ही टाकलेले पाणी वाया गेले असेच समजा.कारण, त्या झाडाची मूळे खोलवर असतात.ते झाड हवे तितके पाणी जमिनीतुन घेण्यास सक्षम असते.खरी पाण्याची गरज असते ती नुकत्याच जमिनीतुन उगवलेल्या रोपट्याला जर आजपासूनच त्या रोपट्याला वेळोवेळी पाणी मिळाले तर उद्या ते नक्कीच एक विशाल झाड बनेल. आणि हेच काम समाजात नवीन निर्माण होणाऱ्या साहित्यिकांचा,कार्यकर्त्याचा  सत्कार  करून ह्या तिन्ही संस्था करीत आहेत. या तिन्हीही संस्थेचे खूप खूप  आभार.
माझ्या छोट्या कार्याबद्दल या तिन्हीही संस्थेमार्फत होणारा माझा सत्कार मला नक्कीच उद्याचे विशाल झाड बनायला मदत करील.
धन्यवाद
संजय बनसोडे
9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...