जेंव्हा एखादा व्यक्ती एखाद्या विषयाची मांडणी करतो ती मांडणी जरी आपल्या मतानुसार अयोग्य असली तरी त्याच्या मतानुसार ती मांडणी योग्य असते.याचे मुख्य कारण, त्याने तो विषय मांडताना त्या विषयाचा न केलेला अभ्यास किंवा जो विषय त्याला मांडायचा त्याची चुकीची मांडणी ह्या दोन मुख्य गोष्टी त्याला कारणीभूत असतात.
एका गटाच्या इभ्रतीच्या विषयला दुसऱ्या गटातले टिंगल टवाळी करणारे अनेक लेखणबहाद्दर आहेत. अश्यात आपण घाई न करता त्या विषयाचे मूळ शोधून चिकित्सक पध्दतीने त्या विषयाची मांडणी करावी. नुकत्याच आंब्याच्या झाडाला आलेला छोटा कोवळा आंबा आपण खाल्ला तर तो तुरट लागेल व तोंडाची चव जाईल.जर नुकतीच कोय आलेला कच्चा आंबा आपण खाल्ला तर तो आंबट लागेल व दात आंबतील.पण तोच पाडाचा आंबा पिकल्यावर आपण खाल्ला तर त्याच्या मधुर चवीने मन प्रसन्न होईल त्या गोडाने आपले सारे अंग गोड झाल्याशिवाय राहणार नाही.
त्या आंब्याप्रमाणेच कुठलाही विषय हाताळताना त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच तो आपल्या लेखणीत अंतर्भूत करावा.
*संजय बनसोडे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा