ॲट्रॉसिटी आणि तापलेले वातवरण
ॲट्रॉसिटी कायदा बदलायचा की नाही हे केंद्र सरकार बघेल. पण कोपर्डी प्रकरणानंतर जी मराठा समाजाची उसळलेलीं लाट सद्ध्या मूक मोर्चांमधून जागोजागी दिसत आहे व त्या आंदोलनाची मागणी ॲट्रॉसिटी बंद करा अशी नसतांना सुद्धा जास्तीत जास्त ॲट्रॉसिटीवरच चर्चा होतांना दिसत आहे.त्यामुळे दोन्हीही समजातून ॲट्रॉसिटी समर्थनात आणि विरोधात एकमेकावर शब्दाचा भडिमार होत आहे. हे बघता प्रकरण चिघळून दोन समाजात डेढ़ निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.ॲट्रॉसिटी बंद करा, मराठ्याने इतिहास बदलला कायदा तर किरकोळ आहे.असे फलक जागोजागी लावून दलित समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. दलित समाजाकडूनही, कायदा बदलून तर दाखवा आम्ही अजून भीमा कोरेगावचा इतिहास विसरलो नाही.असे मेसेज फिरताना दिसत आहेत. येवढ्या दिवस चुप्पी साधलेले राजकीय पक्षही तोंड उघडून "ॲट्रॉसिटी बंद करा "या मागणीला समर्थन करीत आहेत. जर असेच चालू राहिले तर मराठवाडा नामांतरा वेळेस जे घडले ते पुन्हा घडायला जास्त उशीर लागणार नाही. त्यामुळे साहित्यकांनी आपली जात बघून लिखाण न करता चिकित्सक पद्धतीने लिखाण करावे.
खरच ॲट्रॉसिटीचा दलितांकडून गैरवापर होतो का ?
जर कुणी जातिवादक भांडण नसतांनाही जर किरकोळ भांडणासाठी,सूडापोटी,किंवा ब्लॅकमेलींग करण्यासाठी जर ॲट्रॉसिटीचा वापर करीत असेल तर हे प्रकरण निंदनीय आहे. जर मराठा समाजावर कुणी सूडाच्या भावनेने ॲट्रॉसिटी दाखल करीत असेल तर तोही तितकाच शिक्षेला पात्र आहे.कारण एखाद्याला ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक झाली तर त्याला जामीनही मिळत नसल्याने त्याला ज्या परेशानीचा सामना करावा लागतो ते पाहता त्याच्या भावना दलित विषयी काय राहत असतील ?
पण ॲट्रॉसिटी बंदच करा ही मराठा समाजाकडून मागणी होत आहे तीही चुकीची आहे.त्या मागणीचे मी अजिबात समर्थन करणार नाही. जो पर्यंत मराठा समाजाकडून दलितांवर होणारे जातिवादी, अन्याय, अत्याचार,बलात्कार,बहिष्कार,खून असे जातीवादातूने होणारे घाणेरडे प्रकार बंद होत नाहीत तोपर्यंत हा कायदा बंद नाही तर अजून कठोर करण्याची गरज आहे.
जर मराठा समाजाला वाटत असेल की, या कायद्याचा गैरवापर होत आहे तर त्यांच्या संघटनानी तालुक्या तालुक्यात ॲट्रॉसिटीच्या केसेस साठी कमिट्या उभ्या करून ॲट्रॉसिटी लागू झालेल्या ठिकाणी नव्याने योग्य तपास करून, त्यात दोष आढळला तर पोलीसांना त्याची माहिती देऊन तो रद्द करावा हे करतांना निर्णय एकतर्फी होऊ नये म्हणून त्यात दलित कार्यकर्त्याचाही समावेश करावा. जेणेकरून कमिटी मार्फत योग्य निर्णय घेतल्या जाईल.
कुणीही कुणावर अन्याय अत्याचार करणे हे वाईटच. एका जातीच्या व्यक्तीकडून किंवा समूहाकडून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीवर केलेल्या अत्याचार, खून हा हळूहळू त्या व्यक्तीचे वैयक्तिक भांडण न राहता त्या जातीचे होते. व त्याला हळूहळू राजकीय रंग यायला सुरवात होते आणि ते दोन्ही जातीच्या प्रतिष्ठेचे बनून जाते.यात दोन्हीही जातीच्या कार्यकर्त्याने त्या भांडणाच्या मुळात जाऊन योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे पण तसे न होता आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट असे समजून तो गुन्हेगार असला तरी त्याला त्याला जातीआड लपवल्या जाते. खैरलांजी,जवखेडा,खर्डा,सद्ध्याचे नेरुळ येथे झालेली स्वप्ननीलची हत्या असे जातिवादी मानसिकता असणाऱ्या हैवाणाकडून खून, अत्याचार चालूच असतात अश्यात हा कायदा बंद करण्याची मागणी करण्यापेक्षा तो जिथे लागू व्हावा तिथेच लागू झाला पाहिजे अशी मागणी करा व खऱ्या पीड़ित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी मदत करा........
जर कुणी जातिवादक भांडण नसतांनाही जर किरकोळ भांडणासाठी,सूडापोटी,किंवा ब्लॅकमेलींग करण्यासाठी जर ॲट्रॉसिटीचा वापर करीत असेल तर हे प्रकरण निंदनीय आहे. जर मराठा समाजावर कुणी सूडाच्या भावनेने ॲट्रॉसिटी दाखल करीत असेल तर तोही तितकाच शिक्षेला पात्र आहे.कारण एखाद्याला ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक झाली तर त्याला जामीनही मिळत नसल्याने त्याला ज्या परेशानीचा सामना करावा लागतो ते पाहता त्याच्या भावना दलित विषयी काय राहत असतील ?
पण ॲट्रॉसिटी बंदच करा ही मराठा समाजाकडून मागणी होत आहे तीही चुकीची आहे.त्या मागणीचे मी अजिबात समर्थन करणार नाही. जो पर्यंत मराठा समाजाकडून दलितांवर होणारे जातिवादी, अन्याय, अत्याचार,बलात्कार,बहिष्कार,खून असे जातीवादातूने होणारे घाणेरडे प्रकार बंद होत नाहीत तोपर्यंत हा कायदा बंद नाही तर अजून कठोर करण्याची गरज आहे.
जर मराठा समाजाला वाटत असेल की, या कायद्याचा गैरवापर होत आहे तर त्यांच्या संघटनानी तालुक्या तालुक्यात ॲट्रॉसिटीच्या केसेस साठी कमिट्या उभ्या करून ॲट्रॉसिटी लागू झालेल्या ठिकाणी नव्याने योग्य तपास करून, त्यात दोष आढळला तर पोलीसांना त्याची माहिती देऊन तो रद्द करावा हे करतांना निर्णय एकतर्फी होऊ नये म्हणून त्यात दलित कार्यकर्त्याचाही समावेश करावा. जेणेकरून कमिटी मार्फत योग्य निर्णय घेतल्या जाईल.
कुणीही कुणावर अन्याय अत्याचार करणे हे वाईटच. एका जातीच्या व्यक्तीकडून किंवा समूहाकडून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीवर केलेल्या अत्याचार, खून हा हळूहळू त्या व्यक्तीचे वैयक्तिक भांडण न राहता त्या जातीचे होते. व त्याला हळूहळू राजकीय रंग यायला सुरवात होते आणि ते दोन्ही जातीच्या प्रतिष्ठेचे बनून जाते.यात दोन्हीही जातीच्या कार्यकर्त्याने त्या भांडणाच्या मुळात जाऊन योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे पण तसे न होता आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट असे समजून तो गुन्हेगार असला तरी त्याला त्याला जातीआड लपवल्या जाते. खैरलांजी,जवखेडा,खर्डा,सद्ध्याचे
संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा