आदिवासी दिनानिमित्त .........🖋
जातीवर होणारे हल्ले आणि आदिवासी समुदायावर होणारे हल्ले.
एखाद्या विशिष्ट जातीवर होणारा हल्ला (मंग ती जात वरची असो का खालची )किंवा त्या जातींतील महिलेवर होणारा अत्याचार किंवा बलात्काराचे तीव्र प्रतिसाद उमटतांना दिसतात. पण जेंव्हा आदिवासी समुदायावर असे हल्ले होतात त्यांच्या स्त्रीयांवर बलात्कार होतात त्याची सादी माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोचत नाही जरी पोचली तर कोणतीही संघटना त्याविरूध्द आवाज उठवतांना दिसत नाही.
असे का ?
"जात"
जात ही अशी गोष्ट आहे ती मानवी मेंदूतून जाता जात नाही. माणूस खेड्यात असो शहरात असो वा विदेशात असो तो आपली जात विसरत नाही. जेंव्हा जेंव्हा त्याच्या जातीवर हल्ला होतो तेंव्हा तेंव्हा खेड्यात,शहरात,विदेशात असलेले सुशिक्षित अशिक्षित सारेच पेटून उठतात आणि सरकारला दोषीवर कार्यवाही करायला भाग पाडतात. मुळात आपले राजकारण हे जातीवरच अवलंबून आहे. उमेदवाराची जात बघूनच येथे पक्षाची उमेदवारी दिली जाते.आणि तो उमेदवार आमदार खासदार होवो अगर न होवो तो शेवटपर्यंत आपल्या जातीशी बांधील असतो.
आदिवासी
आदीवासी दुर्गम जंगली भागत राहणारा समुदाय जो शिक्षणापासून वंचित आहे. जो या युगातील सोय सुविधा पासून वंचित आहे जो छोट्या छोट्या जातीचा समूह आहे. काही काही भागातील आदिवासी समुदाय तर मतदानाच्या हक्कापासून वंचित आहेत. आदिवासी हा जंगली दुर्गम भागात राहणारा जनसमूह. या समूहातून जो बाहेर शहरात वसतो तो या समुदायातून तुटला जातो. जेंव्हा जेंव्हा त्यांच्यावर हल्ले होतात तेंव्हा तेंव्हा त्यांचा आवाज त्या जंगलातच दबल्या जातो. हीरो हिरोईनचे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लाइव्ह टेलिकास्ट करणाऱ्या मीडियाला आदिवासी समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची भनक सुध्दा लागत नाही.
हाच फरक आहे जातीवर होणाऱ्या हल्ल्यात आणि आदिवासी समुदायावर होणाऱ्या हल्ल्यात.
आज "आदिवासी दिन "नुसते शुभेच्छा देऊन काही होणार नाही तर त्यांचे दुःख त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी व तिथपर्यंत शिक्षण व दुसऱ्या सुविधा पोचण्यासाठी आपण आवाज उठवायला पाहिजे.
संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा