गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

खबरदार, आमच्या वाटेला जाल तर !

एकेकाळी, एका मुस्लिम व्यक्तीनी केलेल्या अमानुष कृत्यासाठी साऱ्या मुस्लिमांना टारगेट करून त्यांच्यावर अत्याचार होत असे. त्यांच्या वस्त्या उध्वस्त करत असत. तोच प्रयोग हल्ली आमच्यावर (बौद्धांनवर) होतांना दिसत आहे.
राक्षसी वृत्तीच्या नराधमाला  जात नसते, नव्हे नव्हे, जात असते ! जर तो दलित,मुस्लिम,बौद्ध असला तर त्याला जात असते.जर ते  प्रस्थापित समाजाचे बांडगूळ असेल  तर बेंबीच्या देठापासून हेच प्रस्थापित  बोंबलतात. अहो बलात्कार करणाऱ्या नराधमाला  जात नसते.
महिलांवर, चिमुकलीवर बलात्कार, अत्याचार करणारे,हे वासनेत तल्लीन झालेले सडक्या मेंदूचे पिसाळलेले कुत्रे असतात त्या कुत्र्याची जात न बघता भर रस्त्यावर सर्वांनी मिळून त्याला  लाठ्या काठ्याने चोपले  पाहिजे व आयुष्यभर जेल मधे सडवले पाहिजे. म्हणजे पुन्हा कुणी असे अमानुष कृत्ये करताना दहा वेळा विचार करेल.
पण हल्ली असे न होता वेगळेच चित्र दिसत आहे.
हजारो वर्षाच्या उकीरड्यातले  सडके मनुवादी किडे  दलित,मुस्लिम,बौद्धांवर अत्याचार करण्यासाठी बहाना  शोधतात व छोट्याशा ठिणगीचे वणव्यात रूपांतर करतात.
60 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानंतर मी ठरवले होते की, आता बस्स ! बस्स झाले आता प्रस्थापित समाजावर टीका करणे आणि त्यांच्या विरुद्ध  लिहणे. आता फक्त लेखणीतून बुद्धाचेच विचार मांडायचे. पण हे जातिवादी उदीरं माझ्या भाऊबंदकीच्या वस्त्यावर धुडघूस घालतात आणि मी षंड बसू ?
ज्या महामानवाने आम्हा बुद्ध दिला त्यांनीच आम्हांला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी षंड बनून थंड बसण्यापेक्षा दुश्मना विरोधात बंड करून गुंड बना हा मंत्र दिला आहे.
बस्स झाले आता ! आणखी किती दिवस हा अन्याय सहन करायचा. या देशात आम्हांला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे की नाही ?
काय आम्ही नक्षलवादी आहोत ?
काय आम्ही आतंकवादी आहोत ?
का आमचा येवढा तिरस्कार ?
आम्ही आत्मसन्मानाने जगतो, आम्ही जय भीम बोलतो, आम्ही आमच्या गाड्यांवर अशोकचक्र लावतो, बाबासाहेबांचा फोटो लावतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो काय ?
काय गुन्हा होता त्यांचा , ज्यांच्या तुम्ही फक्त बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून गाड्या तोडल्या ?
काय गुन्हा आहे त्यांचा, ज्यांच्या घरात जावून सामानाची तोड़फोड़ केली त्यांना मारहाण केली ?
बस्स झाले आता. आम्ही षंड नाहीत. तुमच्या ह्या अत्याचाराने आमच्या रक्तात ज्वालामुखीचा उद्रेक होतोय. ज्या दिवशी या उद्रेकाचे स्फोटात रुपांतर होईल  त्या दिवशी तुम्हांला  पाळता भुई थोडा होईल.
खबरदार, आमच्या वाटेला जाल तर !
आम्हीही छत्रपतीचे मावळे आहोत हे विसरु नका.

संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...