एका गरीबाच्या झोपडीत सायंकाळचे सात वाजले की एका छोट्याशा देवळीत एक रॉकेलच्या तेलाचा दिवा पेटतो.
दिवसभर काबाड़ कष्ट करणारे, उन्हा तान्हात कधी भाकरीविना कधी पाण्याविना राब राब राबणारे ते दोन जीव त्या छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात विसावा घेतात.दिवसभर घामाने,मातीने माखलेले ते त्यांचे शरीर त्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशात मंत्रमुग्ध होउन दगडाच्या भिंतीला टेका देऊन शांत पडते.
दिवसभर भर उन्हात लोखंडाच्या टिकासी,पहारीने दगड मातीचे काम करणाऱ्या त्या पोटाची भूक आपल्या पेक्षा न्यारीच. खरी भूक म्हणजे काय त्या पोटाला विचारावी !
दिवसभर AC च्या थंड्या हवेखाली व नरम गादीच्या खुर्चीवर बसून चार वेळा चहा पिऊन दुपारचे भरपेट जेवण व मधेच मनात आले त्याची चव चाखणारे ते श्रीमंतांचे पोट, जेंव्हा तो रात्री DINNER ला डाइनिंग टेबलवर बसतो, तेंव्हा त्याच्या मनाला एक प्रश्न पडतो, आज आपण काय खायायचे अन् का खायायचे ?
कारण ज्या पोटाला भूक या शब्दाचा अर्थच कळत नाही ते पोट फक्त DINNER या नावासाठी पोटात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करते.दहा दहा बल्ब असणाऱ्या त्या घरातल्या वेक्तीला काय माहीत अंधार म्हणजे काय ?खरतर त्या वेक्तीचे घर कितीही प्रकाशमय असले तरी त्याच्या जीवनात अंधारच असतो. व त्या अंधाराला डावलन्यासाठी तो सतत पळत असतो ,खरा प्रकाश शोधायला, खरे जीवन शोधायला !
त्या झोपडीतील ते दोन जीव मात्र आपली पोटाची आग विझवन्यासाठी चुलीत लाकडे घालून आग लावतात व त्याच्यात आपल्या पोटाच्या आगीला थंड करणारे अन्न, वरण भात बनवून जर्मनच्या ताटात आनंदात वरपतात. आणि रात्रीचे 8: 30/9: 00 वाजता आपल्या झोपडीचे ते तुटके मूटके कवाड (दरवाजा )बंद करून ठिगळ्याच्या गोदड्यावर निवांत झोपतात . शांतपणे , ना पंखा ना AC . गाढ झोपी गेलेले ते दोन जीव.आणि त्या देवळीतला दिवा अगदी शांतपणे डोलत डोलत त्यांना प्रकाश देत राहतो !
इकडे आलीशान घरामध्ये AC च्या थंडगार हवेत आलीशान बेडवर मात्र दुसऱ्या दोन जीवाला झोप येत नाही.
रात्रीचे बारा वाजले होते तरी यांचे डोळे उघडेच होते. हे दोघेही उद्याचा विचार करत होती, जो दिवस अजून उजाडलाच नाही. त्या
दोघापैकी एक मधेच बोलला " डार्लिंग तुला काय वाटते उद्या कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे ? . . . . . . . . . "
संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा