शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

भीम लेखणी विचारपीठचे तीसरे कवी सम्मेलन

14 आँक्टोबर 2016 धम्मचक्र परिवर्तन दिनाचे  औचित्य साधून, राहुल सेवा मंडळ हॉल, गोवंडी येथे  भीम लेखणी विचारपीठचे *आंबेडकरी कवी सम्मेलन* मोठ्या उत्साहात पार पडले. मुंबईतून विविध विभागातून आलेल्या 25 भीम कवींनी, आंबेडकरी विचारधारेच्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कवी सम्मेलन चालू होण्यापूर्वी सर्व भीमकवींनी, काळी फीत लावून नाशिक येथे बौद्ध वस्त्यावर होत असलेल्या भ्याड हल्याचा निषेध केला व कवी सम्मेलनाला सुरवात केली.
कवी सम्मेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींना   *भीम लेखणी विचारपीठचे* कवी, संजय बनसोडे, प्रसाद देठे, प्रमोद पवार, सचिन भालेराव,दीपक गायकवाड,सूचिता कांबळे,सचिन डांगळे, यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार  करण्यात आला.
कवी सम्मेलन दरम्यान  कवी प्रसाद देठे सरांनी केलेले सूत्रसंचालन उल्लेखनीय होते.
माजी सैनिक केशव गो. कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिन निमित्त, भीम लेखणी विचारपीठचे कवी सम्मेलन आयोजीत केले त्याबद्दल कवी श्रीकांत कांबळे सरांचे व भीम क्रांती सेवा मंडळ गोवंडी या संस्थेचे मनपूर्वक आभार.
भीम लेखणी विचारपीठ टीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...