गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

अभ्यासक लिखाण करा

जेंव्हा एखादा व्यक्ती एखाद्या विषयाची मांडणी करतो ती मांडणी जरी आपल्या मतानुसार अयोग्य असली तरी त्याच्या मतानुसार ती मांडणी योग्य असते.याचे मुख्य कारण, त्याने तो विषय मांडताना त्या विषयाचा न केलेला अभ्यास किंवा जो विषय त्याला मांडायचा त्याची चुकीची मांडणी ह्या दोन मुख्य गोष्टी त्याला कारणीभूत असतात.
एका गटाच्या इभ्रतीच्या विषयला दुसऱ्या गटातले टिंगल टवाळी करणारे अनेक लेखणबहाद्दर आहेत. अश्यात आपण घाई न करता त्या विषयाचे मूळ शोधून  चिकित्सक पध्दतीने त्या विषयाची मांडणी करावी.  नुकत्याच आंब्याच्या झाडाला आलेला छोटा कोवळा आंबा आपण खाल्ला तर तो तुरट लागेल व तोंडाची चव जाईल.जर नुकतीच कोय आलेला कच्चा आंबा आपण खाल्ला तर तो आंबट लागेल व दात आंबतील.पण तोच पाडाचा  आंबा पिकल्यावर आपण खाल्ला तर त्याच्या मधुर चवीने मन प्रसन्न होईल त्या गोडाने आपले सारे अंग गोड झाल्याशिवाय राहणार नाही.
त्या आंब्याप्रमाणेच कुठलाही विषय हाताळताना त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच तो आपल्या लेखणीत अंतर्भूत करावा.

*संजय बनसोडे*

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

ॲट्रॉसिटी आणि आरक्षणाची गरज का आहे.

ॲट्रॉसिटीत बदल नाही तर तो कायदाच बंद करा.जाती बघून जर कायदे होत असतील, आरक्षण मिळत असतील तर देशाचे तुकडे व्हायला फारसा वेळ लागणार नाही. असे मराठा संघटनेच्या मूकमोर्चात सहभागी होणाऱ्या काही मराठा नेत्यांचे म्हणणे आहे.
या मराठा नेत्यांचे म्हणणे आम्हांलाही  पटते पण, तागड्याच्या  एका पारड्यात दहा ग्राम वजन आणि एका पारड्यात शंभर ग्राम  वजन असले तर तागड्याचा काटा  समान असूच शकत नाही. तो शंभर ग्राम वजन असलेल्या पारड्याकडेच झुकलेला असेल. जर त्या तागड्याचा काटा आपल्याला समान करायचा असेल तर ज्या ठिकाणी दहा ग्राम वजन आहे त्या ठिकाणी आपल्याला आणखी नव्वद ग्राम टाकावे लागेल तरच दोन्ही  पारडे समान होतील.
तसेच,आरक्षण आणि  ॲट्रॉसिटी सारखे कायदे मागास जातीला समान अधिकार मिळण्यासाठी, व अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी दिले आहेत.
हजारो वर्षापासून जो समाज तुमच्या शेतावर मोलमजुरी करून दिवस कंठीत होता, जो समाज गावातली घाण काढून जोहार मागून  तुमच्या शीळ्या तुकड्यावर जगत होता.जो समाज प्राण्यांची शिकार करून जगत  होता, जो समाज अभिनय करून गावागावात जावून करमणूक करीत होता.जो समाज दगड फोडून आपल्या कुटुंबाचा  गुजारा करीत होता,जो समाज तुमच्या शेतीत लागणारे अवजारे बनवित होता,जो समाज तुम्हांला पाणी पिण्यासाठी मडकी बनवत होता, जो समाज तुमची आणि तुमच्या जनावरांची हजामत करीत होता, या सर्व अनुसूचित जाती जमातीला तुमच्या सारखी  जमीन व दूसरे कामे नव्हती ते वर्षानुवर्ष हेच करीत आले आहेत.हे सर्व समाज पूर्वी  तुमच्यावरच अवलंबून होते  आज ह्या समाजाची फार दैनंदिन अवस्था आहे.त्यांच्या हातात आज कामधंधा नाही,नौकरी नाही,शेती नाही. असा समाज जास्त तर शहरात जावून भेटल ते काम करतांना  दिसतो, काहीजण आजही गावात राहून तुमच्या शेतात राबताना दिसतात.यातल्या काही जणांची परिस्थिती सुधारलीही असेल काहींना आरक्षणातून नौकरी ही लागली असेल पण  सुधारलेल्या कुटुंबाचे प्रमाण किती टक्के आहे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
पारधी समाज आजही रानात राहुन दिवस काढतो त्यांना संवरक्षणाची गरज आहे की नाही ?
वडार समाज आजही भेटेल त्या ठिकाणी कुटुंबासोबत हातोडी घेऊन जातो त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे की नाही ?
आज जर तुम्ही प्रत्येक गावात जावून संशोधन केले तर  तुम्हांला असे आढळेल की सर्वात जास्त कामधंद्यासाठी  स्थलांतरीत झालेला कुठला समाज आहे तर तो बौद्ध आणि मातंग समाज. आजही गावागावातल्या गावकूसावरचा बौद्धवाड्यातले   आणि मातंगवाड्यातले तरुण मुले तुम्हांला शहरातच काम धंद्यासाठी भटकताना दिसतील.
का झाले हे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत ?
कारण त्यांच्या बापजाद्याकडेच जमिनी नव्हत्या तर त्यांच्याकडे कुठून येणार ?
थोडा काही खडकाळ जमिनीचा एक दीड एकर  टुकड़ा आहे त्यात काहीच होत नाही.त्यामुळे जमेल  त्या शहरात ते स्थलांतरीत झाले व भेटेल तो कामधंदा करून आपले पोट भरीत आहेत.काय त्यांना जातीय आरक्षणाची गरज नाही ?
मी असेही म्हणत नाही की, गावातला आणि शहरातला प्रस्थापित मराठा समाजच श्रीमंत आहे.पण मराठा समाजातल्या श्रीमंताची यादी मोठी आहे व मागास समाजातल्या लोकांची सख्या चार पाच टक्क्याच्या वर भरणार नाही. आणि हा फरक समान करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.
ॲट्रॉसिटी बंद करायची की नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेईल पण मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करीत आहे तीही  रास्त आहे. त्यांच्या समाजातही गरीब बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे.त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे पण मागासवर्गीयांचे पारडे आहे त्याच्या खाली जाता कामा नये.

भीमकवी संजय बनसोडे

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

ॲट्रॉसिटी आणि तापलेले वातवरण

ॲट्रॉसिटी आणि तापलेले वातवरण
ॲट्रॉसिटी कायदा बदलायचा की नाही हे केंद्र सरकार बघेल. पण कोपर्डी प्रकरणानंतर जी मराठा समाजाची उसळलेलीं लाट  सद्ध्या मूक मोर्चांमधून जागोजागी दिसत आहे व त्या आंदोलनाची मागणी ॲट्रॉसिटी बंद करा अशी नसतांना सुद्धा  जास्तीत जास्त ॲट्रॉसिटीवरच चर्चा होतांना दिसत आहे.त्यामुळे दोन्हीही समजातून ॲट्रॉसिटी समर्थनात आणि विरोधात एकमेकावर शब्दाचा भडिमार होत आहे. हे बघता प्रकरण चिघळून दोन समाजात डेढ़ निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.ॲट्रॉसिटी बंद करा, मराठ्याने इतिहास बदलला कायदा तर किरकोळ आहे.असे फलक जागोजागी लावून दलित  समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. दलित  समाजाकडूनही, कायदा बदलून तर दाखवा आम्ही अजून भीमा कोरेगावचा इतिहास विसरलो नाही.असे मेसेज फिरताना दिसत आहेत. येवढ्या दिवस चुप्पी साधलेले राजकीय  पक्षही तोंड उघडून "ॲट्रॉसिटी बंद करा "या मागणीला समर्थन करीत आहेत. जर असेच चालू राहिले तर मराठवाडा नामांतरा वेळेस जे घडले ते पुन्हा घडायला जास्त उशीर  लागणार नाही. त्यामुळे साहित्यकांनी आपली जात बघून लिखाण न करता चिकित्सक पद्धतीने लिखाण करावे.
खरच ॲट्रॉसिटीचा दलितांकडून गैरवापर होतो का ?
जर कुणी जातिवादक भांडण नसतांनाही जर किरकोळ भांडणासाठी,सूडापोटी,किंवा ब्लॅकमेलींग करण्यासाठी जर ॲट्रॉसिटीचा वापर करीत असेल तर हे प्रकरण निंदनीय आहे. जर मराठा समाजावर कुणी सूडाच्या भावनेने  ॲट्रॉसिटी दाखल करीत असेल तर तोही तितकाच शिक्षेला पात्र आहे.कारण एखाद्याला ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक झाली तर त्याला जामीनही मिळत नसल्याने त्याला ज्या परेशानीचा सामना करावा लागतो ते पाहता त्याच्या भावना दलित विषयी काय राहत असतील ?
पण ॲट्रॉसिटी बंदच करा ही मराठा समाजाकडून मागणी होत आहे तीही चुकीची आहे.त्या मागणीचे मी अजिबात समर्थन करणार नाही. जो पर्यंत मराठा  समाजाकडून दलितांवर होणारे जातिवादी, अन्याय, अत्याचार,बलात्कार,बहिष्कार,खून असे जातीवादातूने होणारे घाणेरडे प्रकार  बंद होत नाहीत तोपर्यंत हा कायदा बंद नाही तर अजून कठोर करण्याची गरज आहे.
जर मराठा समाजाला वाटत असेल की, या कायद्याचा गैरवापर होत आहे तर त्यांच्या संघटनानी तालुक्या तालुक्यात ॲट्रॉसिटीच्या केसेस साठी कमिट्या उभ्या करून ॲट्रॉसिटी लागू झालेल्या ठिकाणी नव्याने योग्य तपास करून, त्यात दोष आढळला तर  पोलीसांना त्याची माहिती देऊन तो रद्द करावा हे करतांना निर्णय एकतर्फी होऊ नये म्हणून त्यात दलित कार्यकर्त्याचाही समावेश करावा. जेणेकरून कमिटी मार्फत योग्य निर्णय घेतल्या जाईल.
कुणीही कुणावर अन्याय अत्याचार करणे हे वाईटच. एका जातीच्या  व्यक्तीकडून किंवा समूहाकडून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीवर केलेल्या अत्याचार, खून हा हळूहळू त्या व्यक्तीचे वैयक्तिक भांडण न राहता त्या जातीचे होते. व त्याला हळूहळू राजकीय रंग यायला सुरवात होते आणि ते दोन्ही जातीच्या प्रतिष्ठेचे बनून जाते.यात दोन्हीही जातीच्या कार्यकर्त्याने त्या भांडणाच्या मुळात जाऊन योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे पण तसे न होता आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट असे समजून तो गुन्हेगार असला तरी त्याला त्याला जातीआड लपवल्या जाते. खैरलांजी,जवखेडा,खर्डा,सद्ध्याचे नेरुळ येथे झालेली स्वप्ननीलची हत्या असे जातिवादी मानसिकता असणाऱ्या हैवाणाकडून खून, अत्याचार चालूच असतात अश्यात हा कायदा बंद करण्याची मागणी करण्यापेक्षा तो जिथे लागू व्हावा तिथेच लागू झाला पाहिजे अशी मागणी करा व खऱ्या पीड़ित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी मदत करा........

संजय बनसोडे

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

जातिवादी कीड़े

घालित होतो जोहार जेंव्हा,आम्हा छळू लागली
शिकलो सावरलो थोडा आज, तर जळू लागली !

आरक्षणाने बाबाच्या, आज खुर्ची भेटली
बघून सूट बूट माझा, त्याला मिर्ची लागली !

अन्याय करण्या पुन्हापुन्हा, जंग करू लागली
ॲट्रॉसिटी न्यायाची आमुच्या, बंद करू लागली !

झालो थोडा श्रीमंत तर, आम्हा मापू लागली
हक्क छीनण्या आमुचा, सरकारवर तापु लागली !

दारिद्री खड्ड्यात पुन्हा आम्हा, लोटू लागली
खोट्याचे खरे करून पुढेपुढे, रेटू लागली !

एक व्हा रे एक व्हा, संजयाची वाणी सांगू लागली
पुन्हा जातिवादी कीड़े भोवती, रांगू लागली !

*संजय बनसोडे*

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

जातिवादी विचारसरणीच्या मूर्खांसाठी

माझ्या लेखाची व कवितेची योग्य समीक्षा न करता काही जातिवादी, जळाऊ वृत्तीचे लोकं व्यर्थ बडबड करतात.
अशा व्यर्थ टीकाकारासाठी त्यांना लागू होणारा संत तुकाराम महाराजांचा अभंग पहा,

जेवताही धरी / नाक हागतिये परी //
ऐसी याचा करी चाळा / आपुलीच अवकळा //
सांडावे मांडावे / काय ऐसे नाही ठावे //
तुका म्हणे करी / ताक दुधा एकीसरी //
संत तुकाराम

काही मूर्ख लोक फक्त तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्यावर विनाकारण  टीका करण्यात धन्यता मानतात.
अशा मूर्ख लोकांना कोणत्या लिखाणावर टीका करायची आणि कोणत्या लिखाणाची स्तुती करायची हेही माहीत नसते.
जसे, हागणदारीतून जातांना नाक दाबायचे असते.कारण, तो घाणेरडा वास नाकावाटे आपल्या शरीरात जाऊ नये. पण हे मूर्ख लोक जेवताना ही नाक दाबतात आणि मूर्ख असल्याचा जगाला पुरावा देतात.असे करतांना ते एक गोष्ट विसरतात की यात त्यांचीच फजीती होते.कोणती गोष्ट साहित्यातून घ्यायची आणि कोणती टाकायची हे त्या मूर्खाना माहितीच नसते.
हे मूर्ख लोक हागणदारीत कुणी आपला बसला असेल तर त्याचा वास घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.आणि परक्याने  दिलेल्या पंच पकवानालाही नाक दाबून घाण समजतील.  यातूनच त्यांची जातिवादी मानसिकता स्पष्टपणे दिसते.
अशा मूर्ख लोकांना दुधातला आणि ताकातला फरकच समजत नाहीत. हे मूर्ख लोक परक्याने दिलेले ताजे तवाने दूध ही पीनार नाहीत पण आपल्याने दिलेले आंबट ताक ही घटा घटा पितील.

*संजय बनसोडे*

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

ॲट्रॉसिटी बंद झाली तर ?

*ॲट्रॉसिटी बंद झाली तर ?*

गावा गावातला भोतमांगे आपल्या कुटुंबाला पोरका होईल.

रस्त्या रस्त्यावर पोचीराम कांबळेच्या हत्या होतील.

आडरानात एकटीला गाठून पुन्हा बनसोड्याच्या सुनेवर बलात्कार होईल.

बाबासाहेबाची रिंगटोन ठेवल्यामुळे अनेक सागर, जातवादी गुंडाचा पायाखाली चीरडल्या जातील.

सवर्ण जातीच्या मुलीकडे बघितले म्हणून शाळेतून खेचून, पुन्हा नितीन आगे ठेचुन ठेचुन मारल्या जातील.

बौद्ध विहार बांधले म्हणून अनेक निवृत्ती खोब्रागडे जिवंत  जाळण्यात येतील.

एक दलित गावचा सरपंच झाला म्हणून पुन्हा मनोज कसाबला मारल्या जाईल.

सवर्ण मुलीशी प्रेम केले म्हणून पुन्हा सोनईत दलित हत्याकांड घडेल.

गावच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे गीत लावले म्हणून पुन्हा नगरमधे दलित वस्त्यावर दगडफेक होईल.

पुन्हा बेलाड सारख्या अनेक गावकुसावर बहिष्कार टाकून त्यांचे राशन पाणी बंद करण्यात येईल.

पुन्हा चिंभळा गावच्या सवर्णाच्या श्मशान भूमीत दलित व्यक्तीचे प्रेत जाळू दिल्या जाणार नाही.

पुन्हा दरभंगामधे दलित महिलेला मारहान करून लघवी पाजल्या जाईल.

पुन्हा बीड मधे दलित महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्या जाईल.

पुन्हा सरगाव मधे गाडीवर बाबासाहेबांचा फोटो बघून ओव्हरटेक केला म्हणून मारहान केल्या जाईल.

म्हणून माझी सर्व बौद्ध,मातंग,चांभार,कुंभार,वडारअशा अनुसूचित जाती जमातीतल्या सर्वांना नम्र विनंती आहे. एक व्हा व ॲट्रॉसिटी आणखी मजबूत करण्याची सरकारला मागणी करा.

*संजय बनसोडे*
http://bhimlekhani.blogspot.com

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

वांझोट्या जातीला ....

वांझोट्या जातीला,
सनातनी कासरा
धर्म तिचा बाप,
पुरोहित झाला सासरा !

श्रद्धा तीचे लेकरे,
पुजारी तिचा आसरा
आस्तिका मिळे वात्सल्य,
लाथाडी नास्तिक वासरा !

भक्त तिचा स्नेही,
मोहाचा जवळी पिंजरा
जलील करण्या दुसऱ्या,
कुर्तडी त्याच्या लक्तरा !

पोटजात झाली सवत,
द्वेष मैतर तिसरा
कलंकीत अशी रांड,
कवटाळून बसली मत्सरा !

संजय बनसोडे

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मी बाबासाहेब.

मी बाबासाहेब.
माझ्या समाजावर माझ्या इभ्रतीवर नितांत प्रेम करणारा,
मी बाबासाहेब.
माझा समाज मला सूटा बूटात बघायचा होता,
तो मी बघतोय.
माझा समाज मला नोकरशाहीत बघायचा होता,
तोही मी बघतोय.
पण माझा समाज माझ्या समाजात दिसत नाही तर तो समाजाचा घातच करताना दिसतो.
मी कधीच नाही सांगितले,
माझे पुतळे उभारायला.
मी कधीच नाही सांगितले,
माझे दैवतीकरण करायला.
आज मला माझ्या काही आंधळ्या समाजातील लोकांनी देव बनवले.माझे दगडाचे पुतळेही असंख्य झाले.
पण माझे विचार ?
विचार मात्र मेले.
माझ्या विचारप्रवाहाच्या नदीला अडवून  बांध न बांधता माझ्या विचारप्रवाहाचे पाणी माझ्या समाजाने सरळ ब्राम्हणवादाच्या विशाल समुद्रात सोडले आणि नाहीसे केले.
जर माझ्या विचारप्रवाहाच्या नदीला अडवून त्याचे मोठे धरन  बांधले असते तर आज माझा समाज त्या धरनाभोवती सुजलाम सुफलाम बनला असता.
स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी माझा विचारप्रवाह धूळीस मिळवण्यात सर्वात जास्त दोषी मी माझ्या जातींतील पुढाऱ्यालाच समजतो.
एका लाकडाच्या काडीला कुणीही तोडू शकते कारण ती मोळीच्या बाहेर असते पण शंभर काड्याच्या मोळीला तोडायचा विचारही कुणाच्या मनाला सिवणार नाही.
मी माझ्या समाजाला कालही हेच सांगित होतो आणि आजही हेच सांगिन, संघटित व्हा !
पण संघटित न होता दिवसेंदिवस माझा समाज विभागित चालला आहे.
तुमचा उद्धार करण्यासाठी कुणी देव येणार नाही तर तुमचा उद्धार तुम्हांलाच करावा लागेल.हे माझे बोल तुम्हां माहीत असतील तर आजही तुम्ही का दुसऱ्यावर अवलंबून राहता. का स्वयंप्रकाशित होत नाही पुढाऱ्यावरच का अजूनही अवलंबून राहता. तो पैशाच्या लालचीने तुमचा रोज सौदा करतो.तुम्ही मात्र मूंग गिळून गप्प !
अरे मारा असल्या पुढाऱ्याला लाथ आणि व्हा स्वतः पुढे,मला माझ्या समाजात बांडगूळ नाही पाहिजे तर  मला माझ्या समाजात हरेक व्यक्ती समाजासाठी झटणारा पुढारी हवा आहे. जागोजागी पक्ष खोलून त्याला जनावराचे नाव देण्यापेक्षा निस्वार्थपणाने समाजातल्या माणसासाठी एक व्हा !
इथून पुढे मला या समाजात आंबेडकर बघायचे आहेत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारे माकडे नाही.
 -संजय बनसोडे 

पारावरचा मारुती (एक आठवण )

*पारावरचा मारुती*
(एक लहानपणची आठवण )
*संजय बनसोडे* ९८१९४४४०२८

जून महीना उजाडला होता.वातवरण ढगाळ झालं होतं.एप्रिल मे महिन्यात हाहाकार माजवलेल्या सूर्याचे तप्तरूप जमिनीत खोलवर जावून जमीन भेगाडली होती.त्यामुळे सूर्य जरी ढगाआड असला तरी, गर्मीमूळेअंगातून घामाचा पाट वाहत होता.
माझे माय बाप मात्र पत्र फ्यारण्यामधे व्यस्त होते. माझा बाप घरावर चढून, पतरावरची मोठ मोठी दगड बाजूला सारून घरावरचे एक एक पतर मायच्या मदतीने खाली उतरवीत होता. खाली आणलेले पतर माय फड्याने स्वच्छ झाडत होती व फुटक्या ठिकाणी त्याची डागडुज करत होती. पतर साफ झाल्यावर पुन्हा ते पतर वर चढवून त्यावर माझा बाप दगड ठेवीत होता. मी मात्र पत्रावरच्या मातीत काही खेळण्याचे सापडते का,ते शोधीत होतो. मला खाली खेळताना बघून वरून माझा बाप मला आवाज देत होता,
"बापू, बाजूला व्हय !
एखादा दगड बिगड पडल अंगावर तुह्या !"
बापाचे संपल्यावर मायने ही आवाज चढवला,
"व्हय रं डेंगरा बाजूला !
मधी मधी करते माय कामाच्या !"
माझा बाप मला लहानपणी बापूच बोलीत होता.तोअजूनही मला बापूच बोलतो.त्याचे कारण ही तसेच होते.मी होण्या अगोदर माझ्या माय बापाला चार मुली अन्एकच मुलगा  झाला. माझा बाप माझ्या आजोबांच्या खूप लाडका होता आणि एकुलता एक ही ,त्यामुळे माझ्या आजोबांचा माझ्या बापावर फार जीव. पण माझ्या बापाला बापाचे प्रेम जास्त दिवस वाट्याला आले नाही.माझा बाप सोळा सतरा वर्षाचा असतांनाच माझ्या आजोबांची प्राणज्योत मालवली. पण जाताजाता आजोबांनी माझ्या वडिलांकडून एक वचन मागितले,
" जसा तु एकुलता एक हायीस, तसा तुझा वंश नको ठेवू,चांगले चार पाच होऊंदे. साऱ्या भावकित  त्यांचा दरारा असला पाहिजे."
तसा माझ्या बापानेही प्रयत्न केला. पण वाट्याला जास्त मुलीच आल्या. माझ्या मायच्या प्रत्येक गरोदरपणात माझा बाप एका देवाला नवस बोलायचा. मुलगी झाली तर स्वतःला  दोष द्यायचा मुलगा झाला तर देवाचा आशीर्वाद समजायचा. ज्या दोन देवाने माझ्या वडिलांचे नवस पूर्ण केले, एक  माझा भाऊ होतांना आणि दुसरा मी होतांना त्या देवाची सर्वात जास्त कृपादृष्टी आपल्यावर आहे म्हणून अजूनही त्या देवांचे उपास तापास सोडले नाही.मायच्या गरोदरपणात माझा बाप ज्या देवाला नवस बोलला व मुलगी झाली त्या देवाला माझा बाप विसरून गेला पण ज्या देवाला नवस बोलला आणि मुलगा झाला त्या देवाला माझा बाप अद्यापही विसरला नाही. माझा जन्म झाल्यावर माझ्या घरात भावंडांची अर्धा डजन संख्या झाली. मी सर्वात लहान होतो व एका भविष्यवाल्यांनी माझ्या बापाला पैशांने गंडवून भविष्यवाणी केली होती की, हा (मी )साक्षात तुमच्या वडीलांचा अवतार आहे. तुम्हांला ते जीवनाच्या अर्ध्यारस्त्यावर सोडून गेले म्हणून त्यांनी पुन्हा तुझ्या कुळात जन्म घेतला. त्यामुळे मी माझ्या बापाचा फार लाडका होतो. शेतात, जत्रेला, परगावी कुठेही मला ते आपल्या खांद्यावर घेऊन जात. माझ्या बापाला जवानपणी कुश्त्याचा फार नांद होता. जेंव्हा जत्रेत कुश्त्या चालू होत होत्या तेंव्हा ते मला एकट्यालाच घेऊन जात असत. त्यामुळे माझ्या भावंडांना माझा फार राग यायचा.

पावसाळा जवळ येत होता म्हणून साऱ्या गावातच पत्रे फ्यारनी व डाळणी चालू होती. माझ्या बापानेही पत्रे फ्यारनी झाल्यावर लगेच पळसाच्या पानाने घरावर डाळण केले. जेणेकरून पत्रांच्या व भिंतीच्या मधून पावसाचे पाणी आत येऊ नये. जेंव्हापासून वातावरणात बदल झाला तेंव्हापासून मला विचित्र त्रास होत होता.माझ्या साऱ्या अंगाने खाज सुटत होती.हा त्रास मी लगेच माझ्या माय बापाला कळवला.

माझ्या माय बापाने जेंव्हा माझ्या अंगावर निरखून बघितले तर त्यांना" सुवा" (पिसू -ज्या प्राण्यांच्या अंगावर असतात )आढळून आल्या. ह्या सुवा दुसऱ्या तिसऱ्या काही नसून हा आपल्या गावातील मारुतीचाच प्रकोप आहे असे माझ्या मायने निश्चित केले.त्या सुवा बघून माझी माय त्या मारुती देवाला म्हणत होती,
"देवा !
हे मारुती राया !
का सतवतो रे मह्या लेकराला ?"
मी तेंव्हा सात आठ वर्षाचा होतो. हे सारे माझ्यासाठी नवीन होते. हे सारे माझ्या कोवळ्या मेंदूत खोलवर  घर करत होते. मायचे असे बोल ऐकून मी लगेच मायला बोललो,
"माँ...
ह्या मारुतीच्या सुवा ह्यायतं ?"
"होय बाबा "
मंग ह्या मह्या  अंगावून कधी जाणार ?
लय तरास द्यायल्यात मल !
खाजवून खाजवून अंगाची आग होतय मह्या,
त्यो कव्हा त्याच्या सुवा वापस घेणार ?"
असे बोलल्यावर माझ्या मायने माझ्या अंगावरची एक सु घट्ट हातात पकडली.तिला एका कागदावर ठेऊन पुडीबंद करून माझ्या हातात दिली आणि मला म्हणाली,
"जा .........!
एखाद्या सोबत्याला घेऊन,
आणि पारावरच्या मारुती जवळ ही सु सोडून ये !
म्हणजे तुह्या अंगावरच्या साऱ्या सुवा गायब व्हतील."
मी ती कागदाची पुडी हातात घेतली व माझ्या मायने फार मोठी मोहीम माझ्यावर सोपवली असे समजून तडक शेजारच्या बंड्याच्या घरात गेलो,अन् बंड्याला हाक मारली,
"ये बंड्या !
हायेस का घरात ?"
माझा आवाज ऐकताच मायच्या मांडीवर झोपलेला बंड्या ताडकन उठून बाहेर आला आणि बोलला,
"काय रे संज्या ?
काय...?"
"अरे,इकडे ये !
तुला एक गोष्ट सांगायची."
तसा बंड्या लगबगीने खाली आला अन् मला म्हणाला,
"काय,बोल ?"
बंड्या माझ्या जवळ आल्यावर मी सारी हकीकत बयान केली.
बंड्या माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठा असल्यामुळे भोंगळ्या पायाने सारे गाव पालथे घालीत होता.गावातली एकएक गल्ली बोळी त्याला माहीत होती.
मी मात्र बुद्धवाड्याच्या बाहेर अजून पडलोच नव्हतो.शाळाही बुद्धवाड्या जवळच असल्यामुळे मराठवाड्यात (गावात )जाण्याचा प्रश्नच येत नव्हता.
बंड्यान माझं सारं गाऱ्हाण ऐकून घेतल्यावर पुढे म्हणाला,
"अरे, पारावरच्या मारुतीवर आपल्याला जाता येत नाही.
तिथं आपल्याला एखाद्या मराठ्याच्या पोरानं पाह्येलं तर आपल्याला ती मारतील !"
"म्हंजी "
बंड्याचे बोलणे मला थोडे वेगळेच वाटले.
"अरे संज्या,
आपण बुद्धाचे पोरं त्या मारुतीला चालत नाही.
आपण एक काम करू, संध्याकाळ झाल्यावर  आपण त्या पोरांच्या मुकाट्यान मारुतीच्या मंदिराच्या मागं ही सु सोडून येऊ."
बंड्याचे बोलणे ऐकून घेऊन आमच्या दोघांचे मारुतीच्या मंदिरात जाण्याचे नक्की झाले.
पण संध्याकाळ होईपर्यंत माझ्या कोवळ्या मेंदूवर प्रश्नाचा मारा होत होता. आता मला फक्त त्या मारुतीची उत्सुकता लागली होती.ज्याला आम्ही चालत नाही त्यांनी त्याच्या सुवा माझ्या अंगावर का सोडल्या ?
सूर्य ववभर डूबायचा बाकी होता तोच बंड्या माझ्या दारात उभा !
त्याला बघताच मीही खाली आलो.सुवाची पुडी मी घट्ट हातातच पकडली होती. एकटं गावात जाण्याची ही माझी पहीलीच वेळ. एखाद्या वेळी बोटाला धरून पाटलाच्या घरी रई लागल्यावर ताक घेण्यासाठी
माय मला घेऊन जाई.पण आज मी माझ्या स्वतःच्या पायावर गावात जात होतो, मायने दिलेले काम फत्ते करण्यासाठी. एका हातात बंड्याचा हात पकडून व एका हातात कागदबंद सु  घट्ट पकडून कावऱ्या बावऱ्या नजरने पुढे पुढे जात होतो.पारावरच्या मारुतीच मंदिर शेवटच्या टोकाला आणि बुद्धवाडा एका टोकाला असल्यामुळे सारे गाव आम्हांला पालथे घालायचे होते.गावातल्या पाटलाचे घर संपल्यावर पुढचे घरे माझ्या अनोळखीचे होते. बुद्धवाड्यातली घरे दगड पत्राची व त्यावर सेणाचे लिंपण,पण गावातली.माळवदाची घरे बघून मी चकित झालो. प्रत्येक घर हे एकाचढ एक होते. आत सागवाण लाकडाचे माळवद आणि बाहेर भलेमोठ जोतं. त्यावर गावातली सारी मंडळी संध्याकाळच्या वेळी आपआपल्या जोत्यावर बसून आराम करीत होती.काही बायका सुपात गहू तांदूळ घेऊन पाखडत होत्या.पाखडता पाखडता आमच्याकडे बघून एकमेकीस विचारीत होत्या,
"कोणाची गं पोरं ही ?"
शेजारच्या बाईला माहीत असेल तर ती चटकन तिला सांगित होती,
"त्यों पलिकडचा ज्ञानबा बुद्धाचा अन् ह्यो लिंबा बुद्धाचा."
जिला माहीत नव्हते ती सरळ आम्हांला विचारीत होती.
"कोणाची रं पोरहो तुम्ही ?"
तेंव्हा आम्ही दबक्या आवाजात कावरे बावरे होऊन उत्तर देत होतो,
"मी, ज्ञानबा बुद्धाचा "
"आन्
मी ....मी लिंबाजी बुद्धाचा "
हे ऐकून पाटलीन बाई चढ्या आवाजात आम्हाला खडसावत होती.
"ऐधोका इकडं काय चोरी करायलं आले का रे ?"
हे ऐकून आम्ही तेथून चुपचाप काढता पाय घेऊन पुढे पुढे जात होतो. थोड्या वेळाने मी ज्या मारुती रायाची वाट बघित होतो तो क्षण आला.
एक मोठा वटा त्याच्या शेजारी भलं मोठं एक वडाचं झाड़, त्याच्या खोडाला दोऱ्याचा वेढा आणि वट्याच्या मधोमध मारुतीचे  मंदिर त्या मंदिराच्या छोटोशा दरवाज्यातून आत एक मोठा दगड व त्यावर अबडधोबड मूर्तिचे कोरीव काम आणि त्या पूर्ण दगडाला शेंदूरफासलेला. मला बंड्याने सांगितले,
"ह्योच त्यों मारुती."
मारुती दिसताच बंड्याने हात जोडले त्याचे बघून मीही जोडले.
मंदिरा  बाहेर जोत्यावर पाच सहा जन गप्पा मारीत बसले होते. बसता बसता कुणी दोरी वळत होते तर कुणी नुसत्याच गप्पा गोष्टी करीत होते.त्यांच्या नजरा चुकवून आम्ही चुपचाप त्या मंदिरा मागे गेलो आणि हातात असलेली ती सु सोडून तेथून काढता पाय घेतला.तेथून घरी येता येता चांगलाच अंधार झाला होता. माझे मायबाप ही काम करून थकले होते.सर्वांना कडाडून भूका लागल्या होत्या म्हणून आम्हां भावंडांचे लक्ष आता चुलीकडे लागले होते. माझ्या मायने एका चुलीवर मातीच्या मडक्यात डाळ शिजवायाला ठेवली होती अन् ऐका चुलीवर ती भाकरी थापत होती.  तव्यावर टाकलेली आंबटओली भाकर ती चुलीतल्या विस्तवावर भाजून गरम करीत होती अन् माझी मोठी बहीण आम्हांभावंडांना डाळ अन् भाकर वाढत होती.सर्वांचे जेवण झाल्यावर मी रात्रीचा निवांत माझ्या आईच्या खुशीत झोपलो.आज माझे मन ऐका वेगळ्याच गोष्टीमुळे प्रसन्न झाले होते. म्हणून आईची राक्षस,देवाच्या गोष्टी न ऐकताच शेंदूर फासलेल्या मारुतीलाच आठवून झोपी गेलो.

भीम लेखणी विचारपीठची पहिली तूर्भे येथील मीटिंग

*भीम लेखणी विचारपीठ* या संस्थेच्या सभासदाची बैठक रविवारी दिनांक 04/09/2016 तारखेला संस्थेचे ऑफीस तूर्भे येथे पार पडली.
*भीम लेखणी विचारपीठ* ही संस्था आंबेडकरी विचार, कविता मार्फत  समाजापर्यंत पोचवण्यास व शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर लिहणाऱ्या कवींना त्यांच्या हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देण्यास  कटिबद्ध आहे. *भीम लेखणी विचारपीठ* मार्फत महिन्यातून एक कवी सम्मेलन घेण्याचे ठरले आहे. कवी सम्मेलनाचा वार हा दर महीन्याचा दुसरा रविवार असणार आहे.
रवीवारी झालेल्या संस्थेच्या मीटिंग मधे संस्थेचे *सचिव* सन्माननीय प्रसाद देठे सर म्हणाले, सर्व विभागातल्या भीम कवींना एकत्रित करण्यासाठी  *भीम लेखणी विचारपीठ*च्या सर्व सदस्यांनी आपापल्या विभागातील संघटक म्हणून जबाबदारी स्विकारावी.
संस्थेचे *उपाध्यक्ष* सन्माननीय प्रमोद पवार सरांनी संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती सांगितली व प्रत्येक पदअधिकारी असलेल्या कवींनी एकएक जबाबदारी स्वीकारावी जेणेकरून संस्थेचे काम सुरळीत पार पडेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या   जीवनावर  कविता, गजल लिहणाऱ्या नवोदितांना सादरीकरणा संबंधी तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात यावे. अशा विविध गोष्टीवर चर्चा झाली संस्थेची दूसरी मीटिंग येत्या शनिवारी दिनांक 10/09/2016 ठिक चार वाजता.
A/2,ROOM NO-124, SECTOOR NO-21,VASHI (TURBHE) CIDCO COLLONY NAVI MUMBAI-400705.
येथे होणार आहे त्या मीटिंग मधे संस्थेची घटना व कवी सम्मेलनाचे ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे तरी सर्व कवी मित्रांना विनंती आहे की, ज्यांना *भीम लेखणी विचारपीठ* चे सदस्य होण्याची ईच्छा असेल त्यांनी शनिवारी हजर रहावे ही विनंती.
1) अध्यक्ष - *सचिन भालेराव*
2)उपाध्यक्ष - *प्रमोद पवार*
3)सचिव - *प्रसाद देठे*
4)कोषाध्यक्ष - *सूचिता कांबळे*
5)सल्लागार - *राहुल साळवे*
6)संघटक प्रमुख *सचिन डांगळे*
*मो.9819444028*

पोवाडा

जातिवादाचं   बियाणं  मातीत उगवलय सारं
मातीत उगवलय सारं, चिभडलय समतेचं हे बारं !
करी बेजारं
अशी हुंकारं
पेटली द्वेषाची ललकारं !!

जाती जातीत विष पेरलं,कसला याचा लढा
कुलांकार होऊनी जातो, कुलवाडी भूषणाच्या गडा !
असा गधडा
नाही रांगडा
केला स्वराज्याचा चुराडा !!

आपले म्हणूनी दुश्मन पोसितो,मित्राला मारीतो लाथ
आपल्याच घरात विष ओकीतो,करितो विषमतेची हा बातं !
अशी औलाद
करी जातिवाद
झाली मानवता बर्बाद !!

शिव फुले शाहू आंबेडकरी, कापिला यानं जोंधळा
धुळिस मिळवले स्वराज्य,केला देश यानं आंधळा !
असा पांगळा
कापितो गळा
दाखवी हुकुमशाही बळा !!

कवी-संजय बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...