*ॲट्रॉसिटी बंद झाली तर ?*
गावा गावातला भोतमांगे आपल्या कुटुंबाला पोरका होईल.
रस्त्या रस्त्यावर पोचीराम कांबळेच्या हत्या होतील.
आडरानात एकटीला गाठून पुन्हा बनसोड्याच्या सुनेवर बलात्कार होईल.
बाबासाहेबाची रिंगटोन ठेवल्यामुळे अनेक सागर, जातवादी गुंडाचा पायाखाली चीरडल्या जातील.
सवर्ण जातीच्या मुलीकडे बघितले म्हणून शाळेतून खेचून, पुन्हा नितीन आगे ठेचुन ठेचुन मारल्या जातील.
बौद्ध विहार बांधले म्हणून अनेक निवृत्ती खोब्रागडे जिवंत जाळण्यात येतील.
एक दलित गावचा सरपंच झाला म्हणून पुन्हा मनोज कसाबला मारल्या जाईल.
सवर्ण मुलीशी प्रेम केले म्हणून पुन्हा सोनईत दलित हत्याकांड घडेल.
गावच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे गीत लावले म्हणून पुन्हा नगरमधे दलित वस्त्यावर दगडफेक होईल.
पुन्हा बेलाड सारख्या अनेक गावकुसावर बहिष्कार टाकून त्यांचे राशन पाणी बंद करण्यात येईल.
पुन्हा चिंभळा गावच्या सवर्णाच्या श्मशान भूमीत दलित व्यक्तीचे प्रेत जाळू दिल्या जाणार नाही.
पुन्हा दरभंगामधे दलित महिलेला मारहान करून लघवी पाजल्या जाईल.
पुन्हा बीड मधे दलित महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्या जाईल.
पुन्हा सरगाव मधे गाडीवर बाबासाहेबांचा फोटो बघून ओव्हरटेक केला म्हणून मारहान केल्या जाईल.
म्हणून माझी सर्व बौद्ध,मातंग,चांभार,कुंभार,वडारअशा अनुसूचित जाती जमातीतल्या सर्वांना नम्र विनंती आहे. एक व्हा व ॲट्रॉसिटी आणखी मजबूत करण्याची सरकारला मागणी करा.
*संजय बनसोडे*
http://bhimlekhani.blogspot.com
३ टिप्पण्या:
म्हणून वेळ आहे तोपर्यंत खोट्या केसेस मागे घ्या आणि इथून पुढे खोट्या केसेस पडणार नाहीत याची काळजी घ्या नाहीतर ऍट्रॉसिटी असूनदेखील वरील सर्व रोखता येणार नाही

टिप्पणी पोस्ट करा