बोहल्यावर चढत असतांना
दुसऱ्या बाजूला
तिच्या स्वप्नांची तिरडी सजत होती.
ज्या अग्निला साक्षी मानून
ती फेरे घेत होती
ती अग्नि
दूसरे तीसरे काही नसून
तिच्या स्वप्नाचे जळणारे सरण होते
आणि तिच्या आयुष्याचे रोजचे मरण होते.
आपल्या सुखांना तिलांजली वाहून
ती निघाली
एका अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटायला.
उराशी हजारों स्वप्ने बाळगून.
दुसऱ्या बाजूला
तिच्या स्वप्नांची तिरडी सजत होती.
ज्या अग्निला साक्षी मानून
ती फेरे घेत होती
ती अग्नि
दूसरे तीसरे काही नसून
तिच्या स्वप्नाचे जळणारे सरण होते
आणि तिच्या आयुष्याचे रोजचे मरण होते.
आपल्या सुखांना तिलांजली वाहून
ती निघाली
एका अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटायला.
उराशी हजारों स्वप्ने बाळगून.
त्यांनी मात्र लग्न नावाच्या बाजारातून
एक वस्तु उपभोगायला आणली होती
ती पण, हूंडा नावाच्या रिवॉर्ड पॉईंट सोबत.
साऱ्या कलमांना फाट्यावर मारून
तो करीत होता
एका निरागस शरीरावर कानूनन बलात्कार.
375/76 कलमांना
पती पत्नी नावाच्या पेटीत कोंबून
तिच्या किंकाळय़ा दबल्या जात होत्या
रोजच एका बंद खोलीत.
तिच्या "ना" वर ही प्रभुत्व मिळवत
तिच्या स्वप्नांचा चुराडा करत
तो बनला होता
"नवरा नावाचा शैतान"
एक वस्तु उपभोगायला आणली होती
ती पण, हूंडा नावाच्या रिवॉर्ड पॉईंट सोबत.
साऱ्या कलमांना फाट्यावर मारून
तो करीत होता
एका निरागस शरीरावर कानूनन बलात्कार.
375/76 कलमांना
पती पत्नी नावाच्या पेटीत कोंबून
तिच्या किंकाळय़ा दबल्या जात होत्या
रोजच एका बंद खोलीत.
तिच्या "ना" वर ही प्रभुत्व मिळवत
तिच्या स्वप्नांचा चुराडा करत
तो बनला होता
"नवरा नावाचा शैतान"
संजय बनसोडे 9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा