मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

मलाही वाटतं,तुझ्यावर लिहावं

मलाही वाटतं,तुझ्यावर लिहावं
तुझ्या ओठावर
तुझ्या नयनावर
तुझ्या केसांवर
तुझ्या गालावर
हसऱ्या चेहऱ्यावर
तुझ्या चालण्यावर
तुझ्या बोलण्यावर
पण काय लिहावं ?????
मला सद्ध्या काल्पनिक लिखाण जमतच नाही.
मी हल्ली भावनिकच होत चाललोय
आणि हळूहळू
मनातील भावना कागदावर उमटू लागल्यात
मंग त्या विद्रोहाच्या असो का प्रेमाच्या.
खरे तर प्रेम आणि माझा
दूरदूर पर्यंत संबध नाही.
पण का,कोण जाने
मी हळूहळू प्रेमाजवळ चाललोय.
का ?
कुणाच्या ?
कशासाठी ?
हे मलाही माहीत नाही.
पण ह्रुदयातल्या
प्रेम नावाच्या वाळलेल्या झाडाला
पुन्हा नवीन पालवी फुटत आहे
हे मात्र नक्की.
पुन्हा वसंत बहरू पाहतय
तु येशील ना !
माझ्या बहरलेल्या वसंतात
मोर होऊन नाचायला ?
संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...