मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

भारत आमचाही देश आहे...

अरे ...रटाळणाऱ्या मसणवट्यांनो 
आम्ही तुमच्या गावाबाहेर आहे
देशाबाहेर नाही.......
तुमची जातिवादी
कोल्हेकुई झाली असेल तर,
एकदा जाती अंतासाठीही
मोर्चे निघू द्या.......
आजही तुमच्या लग्नात
आमची पंगत शेवटीच बसते
तेही ताटा तांब्या सोबत ........
गावातल्या सावकऱ्यांनो
शेटजी भटजीनो,
आजही तुमच्या गावात
आमच्या वाटेला बाटच आलाय....
आजही सूर्के मारीत पीतो
आम्ही तुमच्या घरातला चाय
फुटक्या ग्लासातून.......
आजही तुमच्या विहीरीवरून
पाणी भरण्याची मुभा नाय
कित्येक देवस्थानाची
पायरी चढण्याची अनुमती  नाय........
या सळसळत्या रक्ताला
पेटण्या अगोदरच मी बुच मारला
तो एकाच नात्यामुळे.......
नाहीतर कधीच
गावकूसावरून तोफा डागल्या असत्या
तुमच्या उच्चभ्रू वस्त्यावर .....
गाव रंक्तरंजीत करायला
पण नाय ....
हा "भारत आमचाही देश आहे "
आणि तुमचाही .........
संजय एल बनसोडे 9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...