मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

थोतांड थाप

शेंदूर फासलेल्या दगडाला
मी कधीच वाहिली
तिलांजली.
पण मुर्दाड झालेल्या मेंदूतून
उगवतात रोजच
नवनवीन देव.
कदाचीत त्यांना त्यांचा
तेहेतिस कोटीचा आकडा
पूर्ण करायचा असेल.
महानिद्र झालेला खविस
आजही थैमान घालतोय
रात्रीच्या अंधारात.
आणि
नकळत डोक्यातून उगवतो
एक देव.
हा महाभूताचा चमत्कार म्हणावा
का धर्माने मस्तकीं मारलेली
थोतांड थाप.
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...