बुधवार, ११ जानेवारी, २०१७

जात नावाचं गजकर्ण

जातीच्या नावावर,
विषयहीन झालेले
ते आजही काढतात मोर्चे
शहरा शहरातून
दिशाहीन झालेले
शेतकरी
आजही घेतात फाशी
खेड्यापाड्यातून
.
जात नावाचं गजकर्ण
फोफावतय
माणसांच्या गचाड वस्तीत
तुमचं आमचं पुरोगामीत्व
कधीच गळून पडलय
जात नावाच्या उकिरड्यात
आता तर माणसांच्या अस्थितही
जातीने ठेकेदारी मिळवली.
SANJAY L BANSODE
9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...