मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

गांडू नशीब

सालं आपलं नशीबच गांडू
झाटभर पगारासाठी
दिवसभर जिरवावी लागते.....
इन्क्रिमेन्टची अवस्था
त्या पान्हा चोरणाऱ्या म्हशीगत झाली
कितीही पाणी लावून पीळले
तरीही तांब्या रिकामाच.....
कामगारांचा बळी घेत
बॉस रोजच साजरी करतो
बकरी ईद.....
बस आणि लोकलला
वटवाघळा सारखे लटकून
मोकळा होतो न होतो,
थेट रांगेत उभा ठाकतो
राशनच्या....
तिकिटाच्या...
मॉलच्या .....
हॉस्पिटलच्या ......
बाथरूमच्या....
शेवटी
मरणाच्या.......
सालं, सारं जीवन "वेट....र " बनलय ...
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...