श्वास श्वासात राहीना,मन गुंतले असे ते
अलगद काळजावर,उमटले प्रेमाचे ठसे ते
अलगद काळजावर,उमटले प्रेमाचे ठसे ते
माझा मी न राहिलो,सांगू कुणास आता ?
गर्दीने गजबजलेले,गाव कुठे वसे ते ?
गर्दीने गजबजलेले,गाव कुठे वसे ते ?
मी भाळलो तुझ्या त्या, थोड्याशा बोलण्याने
हसऱ्या तुझ्या त्या गालावरी, नकळत फसे ते
हसऱ्या तुझ्या त्या गालावरी, नकळत फसे ते
मन मनास बोले, तु होशील का माझी ?
ना ऐकताच मन, मनावरीच रूसे ते
ना ऐकताच मन, मनावरीच रूसे ते
झाले कसे असे हे,मलाही कळले नाही
पापणी मिटताच डोळे,तुझ्या प्रेमात घुसे ते
पापणी मिटताच डोळे,तुझ्या प्रेमात घुसे ते
Sanjay L Bansode 9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा