अंधार पेलणारे, किरणें खट्याळ झाली
उठा नव्या आशेने, पुन्हा सकाळ झाली !!
उठा नव्या आशेने, पुन्हा सकाळ झाली !!
होतो जखडलेला,त्या प्रारब्ध काळोखात
त्या सत्ताधारी तिमिराचे, अदृश्य कंकाळ झाली !!
त्या सत्ताधारी तिमिराचे, अदृश्य कंकाळ झाली !!
प्रसृत होते सारे, स्वप्न काजव्यांचे
प्रकटता मार्तंड, स्वप्ने आभाळ झाली !!
प्रकटता मार्तंड, स्वप्ने आभाळ झाली !!
आम्हीं शांतीचे भुकेले, ना वैर कुणाशी
बघता अस्त्रे अमुची, आयुध घायाळ झाली !!
बघता अस्त्रे अमुची, आयुध घायाळ झाली !!
आरक्त मानवाचे, मंग जातिभेद कशाला
त्या थोतांड धर्मग्रंथाचे, शब्द रटाळ झाले !!
त्या थोतांड धर्मग्रंथाचे, शब्द रटाळ झाले !!
संजय एल बनसोडे 9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा