मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

स्वप्नात तुझा मी

स्वप्नात तुझा मी, चेहरा चाळत होतो
तुझ्या सुंदरतेवरी, तेंव्हाच भाळत होतो !
विसरलो ते वैरी,ज्यांनी घायाळ मज केले
उबदार तुझ्या नयनांनी,जखमांना वाळत होतो !
असले जरी माझे, जीवन काट्यांवरचे
प्रेमाच्या चाळणीने, ते काटे चाळत होतो !
हरवले होते मन, त्या वेदनेच्या धुक्यातं
धुक्यातून सावरताना,तुलाच न्याहळत होतो !
कोण जाने कसा हा,जीव तुझ्यावर जडला
प्रेमाची फुले तुझ्या त्या,केसावरी माळत होतो !
SANJAY L. BANSODE
9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...