शनिवार, ६ मे, २०१७

कालच रक्तदान करून आलो
पण त्या पिशवीवर
"दलित रक्त " लिहण्याचे
विसरूनच गेलो.
एखाद्या उच्च जातींच्या 
व्यक्तीला ते रक्त चढवले
तर त्याचे
सर्वच शरीर बाटेल
या हेतूने .....
दारासमोर फुटक्या मडक्यात
ठेवलेले पाणी
सारे पक्षी मिळून पीत होते.
त्यांनाही त्यांचा धर्म
विचारायला पाहिजे होता.
त्यांनाही आता सांगायला हवं
हे पाणी
एका शुद्राच्या घरचं आहे....
निसर्गाने तीला तिच्या
वासरासाठी दिलेलं दूध
काल भाकरी सोबत
वरपून वरपून खात होतो.
खाताना मी एक गोष्ट
विसरलोच,
ते एका गो मातेचे दूध होते.....
उद्यापासून
रस्त्यावर बसणाऱ्या भिकार्याला
त्याची जात विचारून
भीक देण्याचा
विचार करतोय......
माणसाला मूळव्याध
होऊन चिटकलेली जात,
महापुरुषाच्या दवाने
थोड्या वेळ शांत बसेल
पण काही दिवसांनी
उचमळणारच .......
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...