गुरुवार, २५ मे, २०१७

हुंडा........

हुंडा........
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हुंडा
जावायाच्या हट्टापाई 
हप्त्यावर काढली होंडा ...!
एक एक पाई कमवीत होतो
दाग दागिने जमवीत होतो
सणवार सारे त्यागित होतो
कारण ....,
एका पोरीचा मी बाप होतो
काळजावानी जपली आजवर
वयात आली यंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
पोरगी आली ज्वानी म्होरं
मनास पडला माझ्या घोरं
टपुन बसले सारे टवाळखोरं
मनास त्यांच्या दडलाय चोरं
लपवू तरी त्यांच्यापासून,
पोर माझी कितींदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
पसंद पडला डॉक्टर नवरा
पैशाच्या होता थोडा हावरा
दहा लाख हूंडा द्या मजला
हसत मुखानी मज वदला
मान पाणी, दाग दागिने
खर्च तुमच्याकडे समंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
गरीबीत मी आलो जरी
पोर मात्र दिली चांगल्या घरी
या हूंड्यापाई आयुष्यभर,
कर्ज फेडतो सावकारी
सुशिक्षित लोकांचा या
कसला हा धंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
संजय एल बनसोडे
9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...