चळवळीच्या गाडीला
बैल बांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
बैल बांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
झुडपामधी लपुन तुला
खूणवतय कोण ?
बसून खुर्चीवर तुला
बनवतय कोण ?
खूणवतय कोण ?
बसून खुर्चीवर तुला
बनवतय कोण ?
भोवती तुझ्या जमला
त्यों तांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
त्यों तांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
झेंडा दिसते फीका
झालं कापड जुनं
बंद कर लेका तुझं
ते विषमतेच गाणं !
झालं कापड जुनं
बंद कर लेका तुझं
ते विषमतेच गाणं !
उभ्या कणसाला त्या
सांग धांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
सांग धांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
संजय एल बनसोडे
9819444028
9819444028
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा