गुरुवार, २५ मे, २०१७

चळवळीचं गाणं


तुझीच नाती तुझीच माती
परि परका तुझ्या तु गावा 
जाग आगरी भावा आता
तु जाग आगरी भावा ll
जमीन गेली शिवार गेलं
तुझचं समदं गेलं
सुधारणाच्या नावाखाली
तुलाच परकं केलं
भेटले का तुला ते सगळे
सरकारनं केला जो दावा
जाग आगरी भावा
आता...............ll
सगळ्यांना तु आपलं केलं
तु मोठ्या मनाचा
तुझ्याच घरा म्होरं उभा तो
बंगला हाय कुणाचा
दर्याचा तु राजा लेका
महाराष्ट्राचा तु छावा
जाग आगरी भावा
आता ...............ll
संजय एल बनसोडे
9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...