रस्त्यावर चालणाऱ्या
एका जोडप्याने
मॅकडोनाल्डमधला
अर्धा प्यालेला कोक
रस्त्यावर फेकला.
जमिनीवर बसलेल्या
पक्षावर घारने
झडप घालावी
तशी त्याने त्या
उष्ट्या कोकवर
झडप घालून तो कोक
हातात घेऊन
प्यायला लागला...
बिना बटनची
गळत असलेली पँट
वर करीत
तो पुन्हा आपल्या
कामाला लागला.
बसच्या प्रतिक्षेत
असलेल्या प्रवाशांचे
शर्ट ओढत तो
मागत होता भीक.
उभे असलेले
त्याला भीक देणे दुरच
त्याचा आक्राळविक्राळ
चेहरा बघून,
त्याच्या स्पर्शाने
कपड़े घाण होतील म्हणून
त्याच्या
लांबच रहात होते....
तो मात्र एका हातात कोक
घेऊन
सर्वांकडे जात होता.
त्याचे घाणेरडे रूप बघून
एकाने त्याला लाथ मारली
व म्हणाला,
"भाग यहाँ से "
आपले गळणारे नाक
मनगटाने पुसत
तो त्याला म्हणाला,
"मारो मत साब
दो दिन से भूका हूँ "
पुन्हा त्या व्यक्तीने
हात उगारलेला पाहून
तो तेथून पळून गेला
एका दुसऱ्या स्टॉपच्या
शोधात....
एका जोडप्याने
मॅकडोनाल्डमधला
अर्धा प्यालेला कोक
रस्त्यावर फेकला.
जमिनीवर बसलेल्या
पक्षावर घारने
झडप घालावी
तशी त्याने त्या
उष्ट्या कोकवर
झडप घालून तो कोक
हातात घेऊन
प्यायला लागला...
बिना बटनची
गळत असलेली पँट
वर करीत
तो पुन्हा आपल्या
कामाला लागला.
बसच्या प्रतिक्षेत
असलेल्या प्रवाशांचे
शर्ट ओढत तो
मागत होता भीक.
उभे असलेले
त्याला भीक देणे दुरच
त्याचा आक्राळविक्राळ
चेहरा बघून,
त्याच्या स्पर्शाने
कपड़े घाण होतील म्हणून
त्याच्या
लांबच रहात होते....
तो मात्र एका हातात कोक
घेऊन
सर्वांकडे जात होता.
त्याचे घाणेरडे रूप बघून
एकाने त्याला लाथ मारली
व म्हणाला,
"भाग यहाँ से "
आपले गळणारे नाक
मनगटाने पुसत
तो त्याला म्हणाला,
"मारो मत साब
दो दिन से भूका हूँ "
पुन्हा त्या व्यक्तीने
हात उगारलेला पाहून
तो तेथून पळून गेला
एका दुसऱ्या स्टॉपच्या
शोधात....
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा