शनिवार, ६ मे, २०१७

न पटणारे सत्य.....


न पटणारे सत्य.....
त्याला देवाच्या गोष्टी
सांगू नका साहेब
तो एक नास्तिक आहे 
आताच तो बुद्धाच्या
मूर्तीसमोर नतमस्तक
होऊन आलाय.........
त्याला देवाची व्याख्या
सांगू नका साहेब
तो विज्ञानवादी आहे
त्यांनी मूर्ती भंजक
बाबासाहेबांनाही
परमपूज्य उपमा दिली....
त्याला जातिवाद
शिकवू नका साहेब
तो जातीअंताची
लढाई लढत आहे
आपल्या जातीचा
उदोउदो करून
दुसऱ्या जातीवर शिंतोडे
उडविण्यातच त्यांनी
सारे जीवन व्यथित केले....
त्याला महापुरुषाच्या
गोष्टी सांगू नका साहेब
त्यानी त्याचा महापुरुष
जातीच्या दावणीला
बांधलाय
अन् खुशाल टीका करतोय
दुसऱ्या जातींच्या
महापुरुषावर.....
त्याला धर्माच्या गोष्टी
शिकवू नका साहेब
त्यांनी कधीच
जाती धर्माला
तिलांजलि वाहिली
तो नुकताच
श्रामनेर मधून आलाय.....
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...